अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
सिद्धार्थनगरात तरुणीला छेडछाड केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चार जणांनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर चाकू आणि दांडयाने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे.फिर्यादी ओंकार रमेश नेटके (वय १८, रा. सिद्धार्थनगर, सारडा कॉलेज मागे, अहिल्यानगर, यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी महेश ससाणे, अनिकेत अशोक नेटके, मंगल अशोक नेटके आणि ज्योती ससाणे (सर्व रा. सिद्धार्थनगर) यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
ओंकार याच्या लहान बहिणीस अनिकेत नेटके याने वारंवार छेडछाड करत त्रास दिला. याबाबत ओंकार यांनी यापूर्वी अनिकेतला समजावले होते. मात्र, १ जुलै २०२५ रोजी रात्री ८:०० वाजता अनिकेतने ओंकार यांना फोन करून सिद्धार्थनगरात बोलावले. याबाबत ओंकार यांनी आई पदमा, वडील रमेश आणि बहीण तनुजा यांना सांगितले. सर्वजण अनिकेतच्या घरी गेले असता तिथे मंगल नेटके आणि ज्योती ससाणे उपस्थित होते.
जुन्या वादावरून चर्चा सुरू असताना महेश ससाणे आणि अनिकेत ससाणे तिथे आले. अनिकेतने ओंकार यांच्या डोयावर दांडयाने, तर महेशने चाकूने हल्ला केला. भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेले पदमा आणि रमेश यांनाही चाकू आणि दांडयाने मारहाण करून जखमी करण्यात आले.