spot_img
अहमदनगरजमलेले लग्न मोडले, पुढे नको तेच घडले!, मुलीने घेतला धक्कादायक निर्णय..

जमलेले लग्न मोडले, पुढे नको तेच घडले!, मुलीने घेतला धक्कादायक निर्णय..

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री: –
जमलेल्या लग्नास मुलगा व मुलाच्या कुटुंबीयांनी काही महीन्यातच या लग्नास नकार दिला. त्यामुळे जमलेले लग्न मोडल्याने 22 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलासह त्याच्या आई वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुलीचे वडील सतिष दादासाहेब सुरवसे (रा. डिसलेवाडी ता. जामखेड) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला 27 मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून मुलाकडील मुलगा महेश दत्तात्रय मेंगडे हल्ली (रा. चिखली कदळवाडी मोशी ता. चाकण जि. पुणे, मुळ रा. कर्जत) अनुजा दत्तात्रय मेंगडे व दत्तात्रय पांडुरंग मेंगडे (हल्ली. रा. कर्जत ता. कर्जत, जि. आहील्यानगर) या तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मयत मुलगी मोनिका सतिष सुरवसे (वय 22 वर्षे रा. डिसलेवाडी ता. जामखेड) हीचा विवाह कर्जत येथील मेंगडे कुटुंबातील मुलाशी जमला होता. मात्र लग्न जमल्यानंतर दि 18 फेब्रुवारी 2025 ते 27 मार्च 2025 रोजी पर्यंत आरोपी मुलगा महेश दत्तात्रय मेंगडे याने मुलीस वेळोवेळी म्हणत होता की तु मला आवडली नाही, मला तु मॅच होत नाही, आपली जोडी शोभून दिसत नाही असे म्हणुन मयत मोनिका हीस अपमानित केले. तसेच मुलाची आई आरोपी अनुजा दत्तात्रय मेंगडे व मुलाचे वडील दत्तात्रय पांडुरंग मेंगडे रा. कर्जत हे फिर्यादी मुलीच्या वडीलांना म्हणत होते की तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभुन दिसत नाही.

त्यामुळे माझ्या मुलीचे जमलेले लग्न मोडले व या कारणावरून माझ्या मुलीने मानसिक त्रासामुळे दि 27 मार्च 2025 रोजी दुपारी 11 ते 02 वाजण्याच्या पुर्वी डिसलेवाडी येथे रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे मुलीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मुलाकडील मुलासह आई वडिल आशा तिघांवर जामखेड पोलीस स्टेशनला दि 27 रोजी म्हणजे त्याच दिवशी रात्री आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नंसोनवलकर हे करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मिशिदीत स्फोट; महाराष्ट्रात भयंकर प्रकार..

Maharashtra Crime News: मशीद स्फोटप्रकरणी २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विजय गव्हाणे आणि...

शिर्डी विमानतळावर होणार नाईट लॅण्डिंग!

हैदराबादहून आलेल्या प्रवाशांचे प्राधिकरणाच्यावतीने प्रवाशांचे स्वागत शिर्डी | नगर सह्याद्री राज्यात कमी कालावधीत सर्वाधिक वेगवान ठरलेल्या...

‘अहिल्यानगरमध्ये रमजान ईद उत्साहात’

हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर केली सामुदायिक नमाज अदा; एकात्मता व शांततेसाठी प्रार्थना अहिल्यानगर ।...

शासनाकडे ‘ती’ सेवा बळकट करण्यासाठी पाठपुरावा करणार;आमदार जगताप यांची मोठी माहिती

शीघ्र प्रतिसाद वाहनाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते लोकार्पण अहिल्यानगर...