spot_img
अहमदनगरबनावट आधार कार्ड देत फसवणूक करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या

बनावट आधार कार्ड देत फसवणूक करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

शिर्डी येथे हॉटेलमध्ये बनावट आधारकार्ड देत मुक्कामी असलेले फसवणुकीच्या गुन्ह्यातील पसार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. वसीम ताहीर शेख, फिरोज रफीक शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या आरोपीकडून पोलिसांनी मोबईल, थार,व इतर साहित्या असा सुमारे १३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ही माहिती दिली आहे.

शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री येथे २ संशयीत इसम बनावट आधारकार्ड देत राहत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री येथे जावुन सदर ठिकाणावरील तसेच हॉटेलच्या आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन संशयीतांचे फोटो गुप्तबातमीदारांना प्रसारीत केले. पथक गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, प्रसारीत केलेल्या फोटोतील २ संशयीत इसम हे काळ्यारंगाचे विना क्रमांकाचे महिंद्रा थार गाडीमधुन छत्रपती संभाजीनगर येथुन नेवाशाच्या दिशेने येत आहेत.

पोनिआहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन आरोपी विरुध्द कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. पथकाने तात्काळ खडका फाटा, ता.नेवासा येथील टोल नाका येथे जावुन सापळा रचुन थांबलेले असतांना थोडाच वेळात काळ्या रंगाची विना क्रमांकाची थार गाडी येताना पथकास दिसली. पथकाने सदर गाडी थांबवण्याचा इशारा करताच संशयीतांनी ताब्यातील थार गाडी छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने वळवुन पळुन जाण्याच्या तयारीत असतांना पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. या आरोपींकडून बॅगची झडती घेतली असता त्यांचेकडे विविध प्रकारचे रसायनांच्या बाटल्या, मोबाईल फोन व महिंद्रा कंपनीची थार असा एकुण १३लाख३५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...