spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे पुढे घेण्यावरून झालेल्या वादानंतर एका मंडळाच्या जमावाने दुसर्‍या मंडळातील वाद घालणार्‍या तरुणाला हॉटेल मध्ये लपवून ठेवल्याच्या संशयावरून हॉटेल व्यावसायिकावर तलवार कोयत्याने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी खासगी हॉस्पिटमध्ये उपचार घेत असतांना पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे पुढे घेण्यावरून वाद झाले. एका मंडळाच्या जमावाने हॉटेल व्यावसायिक मनोज उर्फ दत्तात्रय बाजीराव चोभे (वय ३८, रा. बाबुर्डी बेंद, ता.नगर) याच्यावर तलवार, कोणत्याने हल्ला केला. यात चोभे गंभीर जखमी झाला. याप्रकरणी चोभे यांच्या जबाबावरुन दिपक साळवे, राम साळवे, लखन साळवे, साहेबराव कोंडाजी साळवे, शिवाजी गबाजी साळवे, शिवराज अशोक इंगळे, किरण कांबळे, प्रविण कांबळे यांच्यासह ७ ते ८ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तीघांना पोलिसांनी अटकही केली आहे.

दुसर्‍या गटाकडून महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मनोज चोभेसह तिघांवर जातीवाचक शिवीगाळ व महिलांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी दिपक साळवे हा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. तो गुन्ह्यातील आरोपी असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिस व दोन होमगार्ड यांना गुंगारा देऊन आरोपीने शनिवारी सकाळी पलायन केले आहे. याप्रकारामुळे नगर तालुका पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...