spot_img
महाराष्ट्रCrime News : 'ती' वेळ निघून गेली! दिरानं वहिनीला संपवल, 'भयंकर' प्रकाराने...

Crime News : ‘ती’ वेळ निघून गेली! दिरानं वहिनीला संपवल, ‘भयंकर’ प्रकाराने गावच हादरलं..

spot_img

यवतमाळ। नगर सहयाद्री
Crime News : यवतमाळ जिल्हातील मंगरुळ गावामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेच्या पतीने महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून महिलेचा कसून तपास सुरू होता. अखेर १४ दिवसांनंतर महिलेची हत्या झाल्याचं उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

अखेर महिलेच्या हत्यांचा उलघडा करत पोलिसांनी दिराच्या मुसक्या आवळ्या आहे. ज्ञानेश्वर लक्ष्मण जोगे (40) असे आरोपी दिराचे नाव आहे. ३० नोव्हेंबरला रोजी सकाळी महिला शेतात कामासाठी गेली होती.

मात्र त्यानंतर महिला घरी परतलीच नाही. सर्वत्र शोधल्यानंतर अखेर पतीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती.तपासादरम्यान पोलिसांना काल शुक्रवार दि. १५ रोजी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी कटूंबाची कसून चौकशी केली असता दिराने महिलेची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.

शेतीच्या वादातून हत्या

जोगे कटूंबाची मंगरुळ गावामध्ये शेती होती. शेतीच्या हिस्स्यावरून कटूंबात वाद सुरू होते. दीरला एक एकर शेती विक्री करायची होती. वेळोवेळी अडथळा आणत असल्यानं स्वतःच्या वहिनीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...

​कामरगावात दुकानदाराचे घर फोडले; पावणेदोन लाखांचा ऐवज लांबविला

​लबाडीच्या इराद्याने घरातील वस्तू, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला; नगर तालुका पोलिसांत गुन्हा...