अहमदनगर। नगर सहयाद्री-
अल्पवयीन मुली सोबत अतिप्रसंग करून तिला मारहाण करत खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी नगर येथून अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह देहरे येथील एका विहीरीत आढळून आला. साक्षी तुकाराम पिटेकर (वय १३) असे मयत अल्पवयीन मुलीचे नाव आहे.
याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून एका अल्पवयीन मुलीसह गोट्या उर्फ ऋत्वीक संजय जाधव (रा. देहरे) यालाही ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. साक्षी पिटेकर हिला शनिवारी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती.दरम्यान साक्षीचा (मंगळवारी) दुपारी खून झाल्याचे समोर आलेे.
गोट्या उर्फ ऋत्वीक संजय जाधव याचे अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तसेच गोट्या साक्षी सोबत देखील बोलत होता.ही बाब अल्पवयीन मुलीला खटकली. यातूनच त्या अल्पवयीन मुलीने साक्षीला मारहाण केली व तिला देहरे शिवारातील जाधव वस्तीकडे घेऊन गेली. तेथे गेल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीने गोट्या उर्फ ऋत्वीक जाधव याच्या मदतीने साक्षीला हत्याराने डोक्यात मारहाण करून विहिरीत ढकलून देत तिचा खून केला.