spot_img
अहमदनगर'तो' राष्ट्रवादीचा शब्द! आता पारनेर विधानसभेत "मशाल पेटणार"; सुषमा अंधारे नेमकं काय...

‘तो’ राष्ट्रवादीचा शब्द! आता पारनेर विधानसभेत “मशाल पेटणार”; सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या? वाचा एका क्लिकवर..

spot_img

शिवसेनेच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याचा शुभारंभ
पारनेर । नगर सहयाद्री
खा. निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी सभा घेतल्या तसेच मी सुद्धा कर्जत जामखेड भागात सभा घेतल्या व आदित्य ठाकरे यांनी नगर शहरात रॅली काढली. जिल्ह्यात महाविकास आघाडीचा धर्म पाळत लंके साहेबांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.

महाविकास आघाडीच्या बैठकीत पारनेरमध्ये मशाल पेटवू हा राष्ट्रवादीचा शब्द असल्याने आता पारनेर मतदारसंघाची जागा शिवसेनेला हवी आहे अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पारनेर येथे झालेल्या महाराष्ट्र अस्मिता मेळाव्यात केली.

शिवसेनेच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याचा शुभारंभ पारनेरच्या मेळाव्याने झाला. या मेळाव्यातील उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्त्या सुवर्णाताई वाळुंज, शिवसेना वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष धनंजय निमसे, युवासेना जिल्हाप्रमुख इंजि. रवींद्र वाकळे, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, माजी नगर तालुकाप्रमुख रामदास भोर, शरद झोडगे, शिवसेना नेते भास्कर शिरोळे, शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियंकाताई खिलारी, पारनेर युवासेना तालुका प्रमुख अनिल शेटे, बाजार समिती संचालक किसन सुपेकर, डॉ. पद्मजाताई पठारे, नगरसेवक राजू शेख, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश रोहकले, ऍड. कृष्णा जगदाळे, ज्येष्ठ नेते पोपट चौधरी, नितीश करंदीकर, गुलाबराव नवले, बाळासाहेब रेपाळे, संतोष येवले, पंचायत समिती सदस्या ताराबाई चौधरी, सरपंच सुनीताताई मुळे, सरपंच डॉ. कोमलताई भंडारी, डॉ. नीता पठारे, डी. के. पांढरे, सखाराम उजागरे, आयुब शेख, संतोष साबळे, शिवसेना नेते सुभाष भोसले, बाळासाहेब भुतारे, जयसिंग धोत्रे, पोपट दरेकर, चेअरमन संतोष टेकूडे आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने पारनेर येथे उपस्थित होते.

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या बैठकीमध्ये सांगितले गेले होते. पारनेर मधून निलेशभाऊ आता पुढे चालले आहेत आणि ते लोकसभा लढणार आहेत. पण पारनेरची जागा रिकामी होईल मग काय करावं तर पारनेरच्या जागेवर मशाल पेटवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीचे लोक मेहनत घेऊ, आता तो शब्द त्यांनी तेव्हा दिला होता. आणि मला खात्री आहे की ते सुद्धा शब्द पाळणारे आहेत. महाविकास आघाडीच्या पक्षातील एक जबाबदार पदाधिकारी म्हणून नेता आणि प्रवक्ता म्हणून अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने मी माझ्या पक्षप्रमुखांकडे विनंती करते आहे आणि मी जाहीरपणे या सभागृहातून सांगतेलोकसभा निवडणूकीत आम्ही राष्ट्रवादीला खंबीर साथ दिली आहे. शिवसेनेची मशाल तेवत ठेवण्यासाठी आता आम्हाला पारनेरची जागा हवी आहे. भाऊ म्हणून नीलेश लंके यांच्यासाठी मी सभा घेतल्या. नीलेश लंके यांच्या पत्नी राणी वहिणी माझ्या भगिनी आहेत. लोकसभेला नणंद प्रचारासाठी आली तशीच आता भावजय या नात्याने शिवसेनेच्या प्रचाराला राणी वहिणी येतील असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

पारनेरची शिवसेना खंबीर
गद्दारांनी घात करून शिवसेनेत फुट पडल्यानंतर पारनेर तालुका मात्र उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबिरपणे उभा राहिला. संकटाच्या काळात आम्ही शिवसेना वाढवा अभियान राबविले. गद्यारांसोबत शिवसैनिक गेला नाही. तालुक्यातील शिवसेना अभेद्य राहिली. लोकसभा निवडणूकीत आम्ही नीलेश लंके यांना खंबिर साथ दिली. त्यांच्या विजयात शिवसैनिकांचा मोलाचा वाटा आहे. नगर येथे बैठकीत शिवसेनेला पारनेर मतदारसंघ सोडण्याचा शब्द देण्यात आला असून सेनेसाठी जागा घेण्याची जबाबदारी संजय राउत यांनी घेतली आहे. श्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आम्ही खंबिरपणे उभे राहू.
-डॉ. श्रीकांत पठारे (शिवसेना तालुकाप्रमुख)

पारनेर शहरात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
पारनेरच्या लाल चौकात शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे पारनेर शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात उघड्या जीपमधून मोठे शक्ती प्रदर्शन करत पारनेर बाजारपेठेमधून घोषणाबाजी करत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे समर्थकांनमध्ये यावेळी मोठा उत्साह पाहिला मिळाला. पारनेर येथे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले हे शक्ती प्रदर्शन अनेकांच्या भुवया उंचवायला लावणारे ठरले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिरव्या गुलालाचा उन्माद पवारांना नडला! उशिरा ठरलेल्या उमेदवाऱ्या अन्‌‍ जिरवाजिरवीच्या सुपाऱ्याही

बाळासाहेब थोरातांसह नीलेश लंके यांच्या भूमिका महाविकास आघाडीत ठरल्या मारक | उशिरा ठरलेल्या उमेदवाऱ्या...

धक्कादायक! दोन बाळांचे मृतदेह बॅरेलमध्ये तरंगताना दिसले; कुठे घडली घटना?

Maharashtra Crime News: धक्कादायक घटनेनं तालुक्याच जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. एका घरात दोन...

मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांची माघार?; केंद्रात मंत्री होणार..

मुंबई । नगर सहयाद्री:- महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि...

शहरात हिट अँड रन प्रकरण! आ. संग्राम जगताप तात्काळ नगरला; मयत तरुणाच्या कटूंबाची घेतली भेट

आ. जगताप यांनी घेतली हिट अँड रन घटनेतील मयत तरुणाच्या कुटुंबियांचे भेट अहिल्यानगर । नगर...