spot_img
ब्रेकिंग‘लाडकी बहीण योजने’बद्दल केलेले ‘ते’ विधान संजय राऊत यांना भोवलं; काय घडलं...

‘लाडकी बहीण योजने’बद्दल केलेले ‘ते’ विधान संजय राऊत यांना भोवलं; काय घडलं पहा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘लाडकी बहीण योजने’बद्दल केलेल्या वक्तव्य संजय राऊत यांना चांगलेच महागात पडले आहे.

“मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना बंद झाली आहे तर महाराष्ट्रातही ही योजना बंद होऊ शकते” असं वक्तव्य संजय राऊत यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच विधानावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला आहे.

भाजप जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौधरी यांच्या तक्रारीवरून राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या 353 (2) चुकीची माहिती प्रसारित करणे, भ्रम पसरवणे आणि 356 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशात सरकारतर्फे लाभार्थी महिलांना दर महिना 1250 रुपयांचा निधी देण्यात येतो. आता महाराष्ट्र सरकारनेही अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेवरुन राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली आहे. या पद्धतीने ही योजना चालवता येणार नसल्याचं वित्त विभागाच्या सचिवांनी म्हटल्याचं राऊत यांनी सांगितलं. राऊतांच्या या टीकेला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मोहन यादव यांचे प्रत्युत्तर
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी संजय राऊत यांना मध्य प्रदेशात येण्याचे निमंत्रण दिले. ते म्हणाले की,” मध्य प्रदेशात या आणि बघ. मध्यप्रदेशातील १ कोटी २९ लाख भगिनींच्या खात्यात सरकार पैसे जमा करत आहे. लाडकी बहिण योजना सुरू झाल्यापासून एकही महिना असा झालेला नाही की, खात्यात रक्कम जमा झाली नाही. महाराष्ट्रातील निवडणुकीमधील पराभवाच्या भीतीने ठाकरे गट ज्या प्रकारे खोटेपणाचा अवलंब करत आहे, ते चुकीचे आहे,” असे मुख्यमंत्री यादव म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कर्डिले अन् तनपुरे समर्थक भिडले, पुढे नको तेच घडले; गावठी पिस्तुलातून धाड-धाड गोळीबार!

राहुरी । नगर सहयाद्री/;- राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र...

युतीला मिळालेले यश हीच वाढदिवसाची भेट: डाॅ. सुजय विखे पाटील

लोणी । नगर सहयाद्री: महायुतीवर विश्‍वास दाखवून जिल्‍ह्यातील मतदारांनी दहा विधानसभा मतदार संघामध्‍ये मिळालेल्‍या...

Ladki Bahin Yojana: राज्यात महायुती सरकार! आता लाडक्या बहिणींना १५०० की २१०० रुपये? जाणून घ्या..

Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर महायुती सरकार महिलांना दर महिलांना २१०० रुपये...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी आजचा दिवस कसा? जाणून घ्या सविस्तर..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य पैश्याच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट...