spot_img
अहमदनगरमनपाचा 'तो' निर्णय अन्यायकारक! शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले, जनतेवर बोजा..

मनपाचा ‘तो’ निर्णय अन्यायकारक! शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले, जनतेवर बोजा..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. पाणीपट्टीत करण्यात आलेली वाढ अन्यायकारक असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

निवेदन देताना शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव, काका शेळके, आकाश कातोरे, अमोल हुंबे, प्रल्हाद जोशी, दिगंबर गेंट्याल, विशाल शितोळे, पुष्पाताई येलवंडे, सलोनीताई शिंदे, सचिन शिरसाठ आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्थायी समितीच्या वतीने 07 जानेवारी रोजीच्या ठरावाने महानगरपालिका हद्दीतील सध्याची वार्षिक पाणीपट्टी दीड हजार वरून दुप्पट करून तीन हजार करण्यात आलेली आहे.

या वाढीव पाणीपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर फार मोठा बोजा पडणार आहे. अजून नगर शहराची फेज-टू पाणीयोजना पूर्णत्वास गेलेली नाही. ती चालू करण्यात आली नसून, बऱ्याच लोकांच्या पाणी प्रश्नासंदर्भातील वारंवार तक्रारींना नगरसेवकांना तोंड द्यावे लागते.

नागरिकांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये काही कारण नसताना दुपटीने पाणीपट्टी वाढविणे ही बाब अन्यायकारक असल्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.या सर्व बाबींचा विचार करून वाढीव पाणीपट्टीचा मंजूर केलेला ठराव तात्काळ रद्द करण्यात यावा. अन्यथा मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

जनतेवर बोजा टाकणे चुकीचे
शहरात दुपटीने पाणीपट्टी वाढ करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. फेज-टू ची योजना कार्यान्वित नसताना व अनेक भागात पुरेशा प्रमाणात पाणी येत नसताना ही वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा गांभीर्याने विचार करून, सर्वसामान्य नागरिकांवर कराचा बोजा टाकणे चुकीचे ठरणार आहे. पाणी हे सर्वसामान्यांना गरजेचे असून, त्यासाठी अवाच्यासवा वसुलीचा निर्णय रद्द करण्यात यावा.- सचिन जाधव (शहरप्रमुख, शिवसेना)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....