spot_img
अहमदनगरअहिल्यानगर-पुणे महामार्गावरील 'तो' शापित 'युटर्न'; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस यांच्या गाडीने हॉटेल चालक नितीन शेळके यांना उडवले. यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात जातेगाव फाटा, पारनेर तालुक्यामध्ये रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडला. परंतु या घटनेनंतर एक महत्वाचा मुद्दा समोर आला. तो म्हणजे महामार्गावरील याच जागेवर, याच ठिकाणी झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 4 जण शेळके कुटुंबातीलच होते.

या अपघातानंतर कुटुंबियांनी संबंधित विभागावर गंभीर आरोप केले आहेत. या ठिकाणी स्पीड ब्रेकर किंवा धोक्याचा सूचना फलक लावण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे आतापर्यंत 11 पेक्षा अधिक निष्पाप जीव गमवावे लागले आहेत. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होईल? असा संतप्त सवाल शेळके कुटुंबियांनी केला आहे.

प्रशासनाने कार्यवाही करावी
या ठिकाणी प्रशासनाने विविध गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे. तसेच धोक्याचा सूचना फलक लावण्याची मागणी देखील होत आहे. या ठिकाणी होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता प्रशासनाने योग्य ती खबरदारीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता नागरिकांनी बोलून दाखवली आहे.

आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे
पोपट शेळके, दत्तात्रय शेळके, अशोक शेळके, संपत शेळके, दिलीप वाखारे, रामदास गाडीलकर, बाळासाहेब तरटे, प्रभू गाडीलकर, सुनिल नवले, आईशा शेख, जालिंदर पळसकर

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपूर–बेलापूर मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

श्रीरामपूर/ नगर सह्याद्री    श्रीरामपूर–बेलापूर मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या राजपाल वस्त्रालय दालनासमोर गुरुवारी रात्री उशिरा...

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...