spot_img
ब्रेकिंगठाकरे महायुतीवर कडाडले; राज्यात देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ मिळून...

ठाकरे महायुतीवर कडाडले; राज्यात देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ मिळून…

spot_img

अमरावती / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने घोषणांचा पाऊस केला आहे. महायुतीने मतदारांसाठी विविध घोषणा जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीने अनेक भागात प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, याच महायुतीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. ‘तीन भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी महायुतीवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे हे अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान,विधानसभेच्या जाहीर सभेत ठाकरे म्हणाले, ‘खासदार बळवंत वानखेडे यांना आम्ही दिल्लीत पाठवलं आहे. ही दर्यापूरची जागा शिवसेनेला दिली. आपण लोकसभेला दाखवून दिलं, पण हे आव्हान संपलं नाही. माजलेल्या सत्ताधाऱ्यांच्या बुडाखली ठिणगी पेटली आहे. यांच्या डोक्यात सत्ता गेली. हे फुग्यात गेले आहे. येथील खासदार कोणत्या मस्तीत होते, त्यांना तुम्ही हरवलं’.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर बोलताना ठाकरे म्हणाले, ‘मी कर्ज मुक्ती केल्यानंतर कधीच शो केला नाही. मी तुमच्यावर उपकार नाही केले. मी माझं कर्तव्य पार पडलं होतं. मी कमीत कमी काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं’.

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार ठाकरेंनी अमरावतीत घेतला. ‘मुंब्रा आमचाच आहे, तो काय पाकिस्तानात आहे का? फडणवीस यांना मला सांगायचं आहे की, मुंब्रा हे ठाणे जिल्ह्यामध्ये येते. आता त्यांचा पालकमंत्री गद्दार आहे पण गद्दऱ्यांच्या हाताने ते मंदिर होणार नाही ते बांधू शकत नाही. जो राजकोटचा पुतळा बांधला होता, तो वाऱ्यामुळे पडला. मग मुख्यमंत्र्यांची दाढी हालत नाही. दुसऱ्या मुख्यमंत्र्यांचं जॅकेट हालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी माफी का मागितली नाही, असा सवाल करत ठाकरेंनी महायुतीवर टीका केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...