spot_img
अहमदनगर'ठाकरे सेना निवडणुका ताकदीने लढणार', प्रा. गाडे म्हणाले, लवकरच..

‘ठाकरे सेना निवडणुका ताकदीने लढणार’, प्रा. गाडे म्हणाले, लवकरच..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिले असुन शिवसेना पुर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत लवकरच खा. निलेश लंके यांच्या सोबत बैठक घेतली जाईल अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी नगर शहरात शिवसेना ठाकरे गटाची बैठक जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस अहिल्यानगर शहर, नगर तालुका, पारनेर तालुका व श्रीगोंदा तालुक्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थीत होते. या बैठकीस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे आणि महाराष्ट्र धर्मासाठी सज्ज असलेले शिवसैनिक निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार या बैठकीत मांडण्यात आला.

प्रसंगी प्रा. शशिकांत गाडे यांनी सांगितले की, शिवसेनेचे ज्या गटात, गणात व प्रभागात विद्यमान सदस्य व नगरसेवक आहेत त्या जागा शिवसेनेकडेच राहतील.इच्छुक उमेदवारांनी आता निवडणुकीसाठी सज्ज व्हावे. सामान्य जनता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सकारात्मक विचार ठेवा आणि जिद्द सोडू नका. नगर तालुक्यात पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. तसेच खा. निलेश लंके यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करून आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील जागावाटप निश्चित करणार असल्याचे संकेत गाडे यांनी बैठकीत दिले.

शिवसेना आता नव्या जोमाने जनतेसमोर जात असून स्थानिक पातळीवरील प्रश्न, विकासकामे, शेतकरी, तरुण, महिला आणि सामान्य जनतेच्या हितासाठी समर्पित भावनेने काम करणार आहे.या बैठकीस युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, डॉ. भास्कर शिरोळे, पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे, रविंद्र वाकळे, पारनेर शहर प्रमुख निलेश खोडदे, युवासेना नगर प्रमुख प्रवीण गोरे, पारनेर युवासेना प्रमुख अनिल मोटे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गणेश कुलट, संदीप गुंड, प्रवीण कोकाटे आणि डॉ. राम कदम, पोपटराव निमसे, किरण वामन, रा. वि. शिंदे, सोमनाथ कांडके, गणेश गुंड, दिलीप शिंदे, रामेश्वर सोलट, बाबासाहेब ससे, अरुण ससे, डॉ. ससे, बाबा देशमुख आदि पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘अंतरवाली नियोजन बैठकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात सकल मराठा समाजाची नियोजन बैठक उत्साहात’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री २९ जून २०२५ रोजी अंतरवाली येथे होणाऱ्या राज्यव्यापी मराठा समाजाच्या नियोजन...

गुरुवारी अकरावीचा कट ऑफ; नगरमध्ये अकरावीच्या शेकडो जागा रिक्त राहण्याची शक्यता

पुणे | नगर सह्याद्री अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी राज्यातील 12 लाख 71 हजार 201 विद्याथ्यनी नोंदणी...

माजी मंत्री तनपुरेेंना धक्का; समर्थक अजित पवार गटात

मुंबई | नगर सह्याद्री जिल्ह्यातील राहुरीतील डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन, तसेच बाजार समितीचे...

आमच्या पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेची; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आ. जगताप यांना बोलावणे

अहिल्यानगर । नगर सहयाद्री आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची भूमिका घेत मुस्लिम बांधवांविषयी अपशब्द वापरले....