मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून आणि धनुष्यबाणफ चिन्हावरून सुरू असलेला वाद निर्णायक टप्प्यावर पोहोचला. सर्वोच्च न्यायालयात आज (14 जुलै) या प्रकरणावर सुनावणी पार पडली. संपूर्ण राज्याचे लक्ष या निर्णयाकडे लागले होते. धनुष्यबाण चिन्हावरची आजची सुनावणी संपली. पुढची तारीख ऑगस्टमध्ये देण्यात आली आहे. आम्ही ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करु असं सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.
या खटल्याच्या सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने महत्त्वाच्या सूचना दिल्या. न्यायमूत सूर्यकांत यांनी आजच्या सुनावणीत एक महत्त्वाची टिप्पणी केली. त्यांनी ठाकरे गटाला सांगितले की, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा. हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता याप्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ, असे न्यायमूत सूर्यकांत यांनी सांगितले. न्यायमूत सूर्यकांत आणि न्यायमूत जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
यावेळी शिंदे गटाकडून मुकूल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी यु्िक्तवाद केला. तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. न्यायमूत सूर्यकांत यांनी याप्रकरणाची मुख्य सुनावणी सुरु करण्याचे सांगितल्यानंतर कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारखेची मागणी केली. तेव्हा न्यायमूतनी माझे वेळापत्रक तपासून तुम्हाला सुनावणीची तारीख कळवतो, असे न्यायमूत सूर्यकांत यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे उद्धव गटाने न्यायालयाकडे तात्पुरता आदेश मागितला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच – जिथे अजित पवार गटाला चिन्ह वापरण्याची तात्पुरती परवानगी मिळाली होती, तसेच निर्णय व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. दुसरीकडे शिंदे गटाच्या वकिलांनी यास विरोध दर्शवला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आधीच शिंदे गट शिवसेनाफ नाव व धनुष्यबाणफ चिन्हाखाली लढल्या असून, न्यायालयाने यापूव उद्धव ठाकरे यांची अशीच मागणी फेटाळली होती, असा युक्तिवाद त्यांनी केला होता.
हस्तक्षेप याचिकेचा उद्देश सफल
वकील असिम सरोदे यांनी म्हटले आहे की, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल. हस्तक्षेप याचिकेचा उद्देश सफल झालेला आहे. लवकराच लवकर सुनावणी घेतली गेली पाहिजे यासाठी हस्तक्षेप याचिका असते. त्याची कारण दिलेली असतात. त्याचा उपयोग प्रभावीपणे झालेला आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल असं वकिल असिम सरोदे म्हणाले.