spot_img
अहमदनगरठाकरे गटाला अहिल्यानगरमध्ये पुन्हा खिंडार!

ठाकरे गटाला अहिल्यानगरमध्ये पुन्हा खिंडार!

spot_img

शहरासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केला जय महाराष्ट्र | शिवसेना शिंदे गटात प्रवेश
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राज्यभरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर सुरू आहे. शिंदे गट एकापाठोपाठ एक ठाकरे गटाला मोठे धक्के देत आहे. अशातच आता सांगलीनंतर पुणे आणि अहिल्यानगरमधील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूव हा ठाकरेंना मोठा धक्का असून आता शिंदेसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.

अहिल्यानगर शहर व तालुक्यातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) प्रमुख नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि संपर्कप्रमुख सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश करण्यासाठी बुधवारी (दि.26 मार्च) रोजी सकाळी मुंबईकडे रवाना झाले. या प्रवेशाने शहर आणि तालुक्यात शिवसेनाला (उद्धव ठाकरे गट) यामुळे मोठा धक्का बसणार असून, शहरा नंतर नगर तालुक्यातही ठाकरे गटाला खिंडार पडणार आहे.

माळीवाडा बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हे सर्व पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले. यावेळी बाबुशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

यापूवही शिवसेनेच्या (उद्धव गट) अनेक नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता, मात्र आज होणाऱ्या या मोठ्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटासाठी संघटन पातळीवर आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यापूवही अहिल्यानगर शहरातील अनेक नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.

शिंदे गटात प्रवेश करणारे प्रमुख पदाधिकारी
संदेश तुकाराम कार्ले (उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य), शरद मधुकर झोडगे (जिल्हा परिषद सदस्अय), रामदास रंगनाथ भोर (माजी सभापती, पंचायत समिती), डॉ. दिलीप दत्तात्रय पवार (माजी उपसभापती, पंचायत समिती), गुलाब शिंदे (पंचायत समिती सदस्य), प्रकाश कुलट (उपतालुका प्रमुख), विठ्ठल हंडोरे (सरपंच, घोसपुरी), बाबासाहेब भोर (चेअरमन, भोरवाडी), नवनाथ वायाळ (माजी सरपंच, भोरवाडी), बाबासाहेब टकले (माजी सरपंच, भोयरे पठार), अशोक दहिफळे (उपजिल्हा प्रमुख), सुरेश क्षिरसागर (महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना, महाराष्ट्र उपाध्यक्ष), विठ्ठलराव जाधव (उपशहर प्रमुख), शरदराव शेडाळे (भारतीय कामगार सेना), संजय आव्हाड (वाहतूक सेना).

अनिल शिंदे, सचिन जाधव यांचा मास्टर प्लॅन!
शहरासह अहिल्यानगर तालुक्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याने शहर व तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहरप्रमुख सचिन जाधव यांनी राजकीय खेळी करुन पक्षाची ताकत वाढविण्यासह भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन रणनिती आखली आहे. या प्रवेशामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का बसणार आहे. तालुक्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संदेश कार्ले यांनी का सोडले ठाकरे सेनेला…
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी पक्षाकडे पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. नगर-पारनेर मतदारसंघात ठाकरे सेनेची ताकद मोठी असल्याने महाविकास आघाडीत पारनेरची जागा शिवसेनेला मिळणे अपेक्षित होते. परंतु, पारनेरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणि श्रीगोंद्याची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली. श्रीगोंद्यात शिवसेनेची ताकद नसताना जागा सोडण्यात आली. या अदलाबदलीमुळे शहरासह अहिल्यानगर, पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. परिणामी नगर शहर, पारनेर व श्रीगोंद्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभेेला ठाकरे गटाने उमेदवारी न दिल्याने कार्ले यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कार्ले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; कुठे घडला प्रकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे....

घरात घुसून महिलेसोबत ‘तसले’ वर्तन; रावसाहेबवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात मद्य सेवन केलेल्या व्यक्तीने महिलेच्या घरात जबरदस्ती...

गावच्या विकासासाठी आमदार काशिनाथ दातेंनी दिला कानमंत्र; काय म्हणाले पहा…

नेप्तीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन अहिल्यानगर | नगर सह्याद्री गावा-गावातील धार्मिक एकात्मता भारतीय संस्कृतीने जोडली गेलेली आहे....

‘पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ४.४३ कोटींचा नफा’

संस्थापक आ. काशिनाथ दातेंची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पारनेर...