spot_img
अहमदनगरनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार; यांनी केला जय महाराष्ट्र

नगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार; यांनी केला जय महाराष्ट्र

spot_img


अहिल्यानगर /नगर सहयाद्री –
आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहर व तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. ठाकरे गटाचे शहरातील तीन माजी नगरसेवक, दोन पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तर, दोन माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे माजी सभापती यांच्यासह दोन पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासह नगर तालुक्यातील इतरांचा प्रवेश रविवारी ठाणे येथे प्रवेश होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर शहरातील विधानसभा मतदारसंघाची हक्काची जागा सोडल्याने ठाकरे गटाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सुमारे १२ ते १५ नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. त्यातील प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव व दीपक खैरे या तिघांसह शोभना चव्हाण, दिलीप सातपुते यांनीही जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला. तसेच नगर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर, उपतालुका प्रमुख प्रकाश कुलट, सुशील कदम यांनीही ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी काल चर्चा केली. रविवारी ते व तालुक्यातील इतर सदस्य, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...