spot_img
अहमदनगरदहशत, चुकीच्या प्रशासनामुळे विखे यांचा पराभव! माजी महसूल मंत्री थोरात यांचा मंत्री...

दहशत, चुकीच्या प्रशासनामुळे विखे यांचा पराभव! माजी महसूल मंत्री थोरात यांचा मंत्री विखे यांच्यावर निशाणा

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री-
देश पातळीवर भाजपाकडून होत असलेले द्वेष भावनेचे राजकारण आणि राज्यांमध्ये चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार हे जनतेला मान्य झाले नसून याविरुद्ध जनतेने कौल दिला आहे .महाविकास आघाडीला भक्कम साथ दिली असून सरकार विरोधी रोष व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून अहमदनगर जिल्ह्यात मंत्री विखे यांच्याकडून होत असलेले दहशतीचे राजकारण व चुकीच्या प्रशासनामुळे त्यांचा पराभव झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांच्या प्रतिनिधीशी यशोधन कार्यालय या ठिकाणी ते बोलत होते. यावेळी मा. आ. डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, रणजीत सिंह देशमुख ,सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक,निखिल पापडेजा यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ,आरपीआय व मित्र पक्षांचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, देशातील सध्याचे राजकारण आणि राज्य पातळीवर चुकीचा पांयडा पाडून आलेले सरकार या विरोधात जनतेमध्ये अत्यंत रोष आहे. जनतेला असे चुकीचे राजकारण मान्य नसून मतदानातून तो जनतेने तो राग व्यक्त केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला सत्तेचा गैरवापर, त्याचप्रमाणे वाढलेली बेरोजगारी, महागाई, भरती मधील गैरव्यवहार ,विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत गैर व्यवहार , राज्यात बिघडलेली राज्यातील शांतता सुव्यवस्था यामुळे जनता या सरकारवर नाराज आहे.

भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार नसतानाही सातत्याने जनतेमध्ये संपर्कात होते. त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तसेच अहमदनगर मध्ये मा. खा. सुजय विखे हे तरुण होते. त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील मात्र मंत्री विखे यांनी ज्या पद्धतीने दहशतीचे राजकारण करून चुकीचे प्रशासन राबवले याबद्दल जिल्ह्यात मोठा रोष निर्माण झाला. जनतेने विखे यांच्या दहशतीचे झाकण उडवले असून अजून काही बाकी आहे तेही उडणार आहे. नीलेश लंके हा एक सामान्य कार्यकर्ता आहे. कोरोना काळात त्यांनी मोठे काम केले. परंतु पारनेर मध्ये सरकारकडून निर्माण केलेली दहशत यामुळे निलेश लंके यांनी त्यांना मोठी टक्कर देऊन विजय मिळवला आहे.

काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार असून देशाच्या विकासाचा विचार आहे. त्याला ताकद देण्याचे काम सर्वांनी करायचे आहे. राज्यात महाविकास आघाडीला मोठे अनुकूल वातावरण असून आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचा सरकार येणार असून मुख्यमंत्रीही महाविकास आघाडीच्या होणार आहे. खरे तर राज्यामध्ये सध्याचे सरकार कसे आले हे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री यांना माहिती आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. कारण जनतेला सर्व माहिती आहे. या सरकारविरुद्ध जनतेने राग व्यक्त केला असून महाविकास आघाडीला मोठा भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल आमदार बाळासाहेब थोरात यांनी जनतेचे आभार व्यक्त केले. यावेळी गुलालाची उधळण करत जिलेबी वाटत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...