Maharashtra Crime : पुलाच्या कामावर गेलेल्या 5 मजुरांचा वाळूच्या ढिगार्यात दबून मृत्यू झाला आहे. शनिवार (22 फेब्रुवारी) पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर रिचवल्याने 7 कामगार रेतीखाली दबले गेले. रेतीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम करणारे मजूर पुलाशेजारीच पत्र्याचं शेड बांधून राहत होते. मध्यरात्री गाढ झोपेत असतानाच एका वाळूच्या टिप्परने त्यांच्या पत्र्याच्या शेडशेजारी वाळू खाली.
त्यामुळे पाच मजुरांचा जंघीच मृत्यू झाला आहे. एका तेरा वर्षीय मुलीला आणि एका महिलेला वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान जाफराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहे.