spot_img
अहमदनगरAhmednagar: उपसरपंचासह कुटुंबासोबत घडलं 'भयंकर'! आठ जणांच्या टोळक्याने...

Ahmednagar: उपसरपंचासह कुटुंबासोबत घडलं ‘भयंकर’! आठ जणांच्या टोळक्याने…

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
वाहनाचा कट मारल्याच्या रागातून दोघा जणांत झालेले वाद मिटविणे डोंगरगण (ता. नगर) येथील उपसरपंचाच्या अंगलट आले. आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने उपसरपंचासह त्यांच्या पत्नी व आईला मारहाण केली. मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपसरपंच संतोष भागुजी पटारे (वय ३२) यांनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय बाबासाहेब गोपाळे (रा. राहुरी), देविदास बाबासाहेब आढाव, गौरव देविदास आढाव (दोघे रा. डोंगरगण), विशाल सोनवणे (पूर्ण नाव नाही, रा. हिंगणगाव ता. नगर) व इतर अनोळखी चार ते पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: २७ एप्रिल रोजी डोंगरगण फाट्यावर अक्षय बाबासाहेब गोपाळे व जयदीप बाळासाहेब मते यांच्यात वाहनाचा कट मारण्याच्या कारणातून वाद झाले होते. ते उपसरपंच पटारे व इतरांनी मिटविले होते. दरम्यान २८ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता पटारे हे गावातील बसस्थानकावर असताना देविदास आढाव व इतर चार ते पाच जणांनी ‘तुला व घरच्यांना दाखवतो तू काल आम्हाला न्याय नाही दिला’, अशी धमकी दिली होती. त्याच दिवशी दुपारी आढाव याने पटारे यांच्या घरी जाऊन पत्नी केशर यांना धमकी दिली होती.

२९ एप्रिल रोजी पटारे व त्यांचे कुटुंब घरासमोरील पटांगणात झोपलेले असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास अक्षय गोपाळे व इतर तेथे आले. त्यांनी पटारे दाम्पत्याला मारहाण करून जखमी केले. पटारे यांची आई भामाबाई यांना देखील मारहाण करण्यात आली. घरासकट पेटवून देण्याची धमकी देण्यात आली. केशर यांच्या गळ्यातील सोन्याचे दीड तोळ्याचे गंठण, पटारे यांच्या खिशातील १५ हजाराची रोकड धमकी देवून हिसकावून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...