अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
सोमवारी दुपारी अहिल्यानगर पुणे महामार्गावर पळवे शिवारात दोन कारचा भीषण अपघात होऊन यात एकचा मृत्यू झाला असुन तीन जण जखमी झाले आहे. सोमवारी दुपारी अहिल्यानगर-पुणे महामार्गावर मारुती इरटिका कार क्रमांक एमएच 12 एसएल 0095 व टाटा पंच कार क्रमांक एमएच 02 जीजे 2785 या दोन कारचा भीषण अपघात झाला.
यात कैलास आबासाहेब बेंद्रे (वय 41 रा. आंबळे) यांचा मृत्यू झाला असुन अर्चना कैलास बेंद्रे (रा. आंबळे), विजय शिंदे (रा वाळवणे ता. पारनेर), एक महिला (नाव समजले नाही) हे जखमी झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, अमोल धामने यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.