सुनील चोभे / नगर सह्याद्री –
नगर दौंड रोडवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रॅव्हल्स ड्रायव्हर व मोटर सायकल चालक जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
प्रवासी ट्रॅव्हल दौंड कडून नगरच्या दिशेने येत होती. ट्रॅव्हल चालकाने दुचाकी स्वराला वाचविण्याचा प्रयत्न केला. ट्रॅव्हलच रस्त्याच्या खाली जात उलटली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना परिसरातील ग्रामस्थांनी रुग्णालयात नेण्यासाठी तातडीने मदत केली. अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.