spot_img
ब्रेकिंगAhmednagar News Today: भीषण! नगर दौंड महामार्गावर अपघात, ३ ठार 'एवढे' जखमी

Ahmednagar News Today: भीषण! नगर दौंड महामार्गावर अपघात, ३ ठार ‘एवढे’ जखमी

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
अहमदनगर जिल्ह्यामधून भीषण अपघात घडल्याचे वृत्त समोर आले आहे. नगर दौंड महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून सातजखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथील रहिवासी असलेले शेख कुटुंबीय बेलवंडी फाटा मार्ग नबीन वर्षाच्या सुरुवातीला कोळगाव येथील कोळगाववाले बाबांच्या दयांमध्ये दर्शनासाठी महिंद्रा झायलो (क्र. एमएच ०४ ईडी ७१२६) या कारमधून येत होते.

रविवारी सकाळी ७ वाजता घारगाव परिसरात नगर दौड महामार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर समोरून भरधाव वेगाने नगर कडून दौडकडे सीएनजी गॅस बाहतूक करणारा टेम्पो (क्र. एचआर ५५, एपी १९९६४) शी कारची समोरासमोर भीषण घड़क झाली. या अपघातात दोन मुलांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

रोहबान अजिज शेख (३०), गाझी रौफ शेख (१३), तुझेन शोएब शेख (१३, रा.सर्व कल्याण, मुंबई) असे तिन्ही मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे असून रिजवाना अजिज शेख (५७), रिम शोएब शेख (३२), फायजा शोएब शेख (९), शादिन शोएच शेख (११), सना अब्दुल रौफ शेख (३७), अब्दुल रहीम शेख (८), मदिहा शहबाज शेख (२७) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...