अमरावती / नगर सह्याद्री : एक भीषण अपघाताचे वृत्त आले आहे. क्रिकेट खेळायला निघालेल्या तरुणांच्या मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय. यात चार तरुण ठार झालेत. तर १० जखमी आहेत.
अमरावती येथील १४ तरुण यवतमाळला क्रिकेट खेळायला मिनी बसने निघाले होते. सकाळी ७.३० च्या सुमारास हा अपघात झाला. गंभीर झालेल्यांना अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर जवळ हा अपघात झाला.
यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हे १४ तरुण अमरावतीहून यवतमाळसाठी सकाळी निघाले होते. मात्र वाटेतच नांदगाव खंडेश्वरच्या शिंगणापूरजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये ४ तरुणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जमखी झाले आहे. अपघातातील जखमी तरुणांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. अमरावती शहरातील रिम्स हॉस्पिटल मध्ये आता या सर्व जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.