spot_img
महाराष्ट्रAccident News: भीषण अपघात चार ठार! कुठे घडली घटना?

Accident News: भीषण अपघात चार ठार! कुठे घडली घटना?

spot_img

Accident News:  बीड जिल्ह्यातील बर्दापूर फाट्यावर लातूर-बीड महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगळपुर येथील तीन जण आणि एक अन्य व्यक्ती, एकूण चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये बाबूराव खलंगरे, आत्माराम बानापुरे, सौदागर कांबळे यांचासह एकाचा समावेश आहे.ही घटना रात्री २ वाजता मुसळधार पावसात घडली. चार जण स्विफ्ट कार (क्र. एमएच 24 एएस 6334) ने औरंगाबादकडे जात होते. अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गा जवळ कार आणि समोरून येणाऱ्या कंटेनर (क्र. एमएच 12 एमव्ही 7188) यांची जोरदार धडक झाली.

अपघातानंतर कारचा चुराडा झाला आणि चौघे जागीच मृत झाले आहे. बर्दापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...

बिबट्या ठार मारा; तरच चिमुकलीवर अंत्यसंस्कार, खारे कर्जुने ग्रामस्थांचा गाव बंदचा निर्णय

खारे कर्जुने ग्रामस्थांचा निर्णय | गाव बंद | शाळा, महाविद्यालय बंद | बिबट्यांनी हादरवला...