spot_img
ब्रेकिंगलाडक्या बहि‍णींच वाढवणार टेन्शन; सरकारने घेतला मोठा निर्णय

लाडक्या बहि‍णींच वाढवणार टेन्शन; सरकारने घेतला मोठा निर्णय

spot_img

 

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला आयकर विभागाने असहकार दर्शवला आहे. अजूनपर्यंत आयकर विभागाने सहकार्य न केल्याने लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी आता रखडली आहे. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र, लवकरच या अर्जांची पडताळणी होईल. त्यातील नियमांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना अपात्र करण्यात येईल.

लाडकी बहीण योजनेत २ कोटी ६३ लाख महिलांची माहिती दोन महिन्यापूर्वी आयकर विभागाकडे मागण्यात आली होती.मात्र, दोन महिन्यांपासून मागितलेली ही माहिती आयकर विभागाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची तपासणी पूर्ण होऊ शकलेली नाही. परंतु लवकरच या महिलांच्या अर्जांची तपासणी केली जाणार आहे. लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची माहिती मागवण्यात आली होती. मात्र, ही माहिती न मिळाल्याने पडताळणी आता ठप्प झाली आहे.

महिला व बालविकास विभागाने २ कोटी ६३ लाख महिलांची माहिती मागवली होती. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, अशी अट ठेवण्यात आली होती. त्यामुळेच आयकर विभागाच्या मदतीने पडताळणी केली जाणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आता आयकर विभागाने दोन महिन्यांपासून कोणतीही माहिती दिलेली नाही. यामुळे लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत अडथळे येत आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांनी विधानसभा निवडणुकाआधी अर्ज केले होते. यातील काही महिलांनी निकष डावलून लाभ घेतला आहे.

त्यामुळेच महिला व बालविकास विभागाने दोन महिन्यांपूर्वी पत्र लिहून आयकर विभागाकडे महिलांच्या उत्पन्नाबाबत माहिती मागितली होती.परंतु माहिती न मिळाल्यानंतर फेरतपासणीसाठी अडथळे येत आहेत.लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी केली जात आहे. या योजनेत ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे त्यांची अंगणवाडी सेविकांनी जाऊन पडताळणी केली आहे. यासाठी परिवहन विभागाची मदत घेण्यात आली होती. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकीय भूकंप होणार! राजीनाम्यानंतर जयंत पाटील यांना ‘या’ पक्षाची ‘मोठी’ ऑफर?

मुंबई। नगर सहयाद्री महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)...

शनि शिंगणापूर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल! फसवणुकीचा जुगाड पडला महागात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची पूजा, अभिषेक व तेल अर्पण केला जाईल...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जातकांना खुशखबर मिळण्याचे संकेत..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल....

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...