spot_img
ब्रेकिंगटेम्पो वरील ताबा सुटला, नको तोच प्रकार घडला; थेट घरात घुसला, चार...

टेम्पो वरील ताबा सुटला, नको तोच प्रकार घडला; थेट घरात घुसला, चार जण…

spot_img

Ahilyanagar accident news: शहरालगत असलेल्या घुलेवाडी येथे मालवाहू टेम्पो थेट पत्र्याच्या घरात घुसल्याने भिंत अंगावर पडून चारजण गंभीर जखमी झाले. यामध्ये चालकाचाही समावेश आहे. ही घटना मंगळवारी (दि.18) रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली.

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या समोर राजू मनोहर थोरात, सायली राजू थोरात व जुली राजू थोरात हे सर्वजण मंगळवारी रात्री जेवण करून घरात झोपले होते. रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास मालवाहू टेम्पो (क्रमांक एमएच.17, सीव्ही.1110) चा चालक अतिष विलास देवकर याचा टेम्पोवरील ताबा सुटून टेम्पो थेट थोरात यांच्या घराची भिंत तोडून सरळ घरात घुसला.

यामुळे एकच गोंधळ उडाला. घरातील सदस्यांनी मोठ्याने आरडा-ओरडा केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील सदस्यांच्या अंगावर भिंत व पत्रे पडले होते. नागरिकांनी पत्रे बाजूला काढून जखमींना बाहेर काढले आणि औषधोपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, दैव बलवत्तर असल्याने थोरात कुटुंब हे या अपघातातून बालंबाल बचावले आहे, अन्यथा मोठी घटना घडली असती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान टेम्पो घरात घुसल्याने या घटनेमुळे थोरात कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...