spot_img
देशTejas : PM Modi यांनी 'तेजस' मधून केले उड्डाण ! त्यांनी घातलेल्या...

Tejas : PM Modi यांनी ‘तेजस’ मधून केले उड्डाण ! त्यांनी घातलेल्या स्पेशल सूटची चर्चा, जाणून घ्या या सुटची कमाल, त्याचे महत्व

spot_img

नगर सहयाद्री टीम :
PM Modi In Tejas : आज देशाच्या इतिहासात मनाचा तुरा रोवला गेला. संरक्षण विभागात भारतीय बनावटीची फायटर विमाने आली. आज तेजस या फायटर विमानाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण केले.

बेंगळुरूमध्ये तेजस या लढाऊ विमानातून त्यांनी उड्डाण केले आणि भारतीयांनी एकच आनंदोत्सव साजरा केला. वयाच्या ७३ व्या वर्षी पंतप्रधानांनी दाखवलेले हे धाडस कौतुकाचा विषय बनला आहे. या फ्लाइट दरम्यान पीएम मोदींनी एक विशेष सूट परिधान केला होता. सध्या या सूटची देखील चर्चा आहे. याला G सूट असे म्हणतात. हा सूट का घालतात ? त्याची काय वैशिष्ट्ये आहेत याविषयी आपण याठिकाणी माहिती घेऊयात –

काय आहे G सूट
तेजसच्या फ्लाइट उड्डाण दरम्यान पीएम मोदींनी परिधान केलेला सूट म्हणजे जी सूट आहे. प्रत्येक फायटर पायलटने हा जी-सूट घालणे आवश्यक असते. G सूट म्हणजे ग्रॅविटी सूट आणि त्याची गरज पहिल्यांदा 1917 मध्ये जाणवली. खरे तर लढाऊ विमानांमध्ये उड्डाण करताना पायलट बेशुद्ध झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती.

या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहता, 1931 मध्ये सिडनी विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक फ्रँक कॉटन यांनी मानवी शरीरातील गुरुत्वाकर्षणाचे केंद्र ठरवण्याविषयी सांगितले. त्यांनी 1940 मध्ये लोकांना अँटी-ग्रॅव्हिटी सूट किंवा जी-सूटची गरज समजावून सांगितली. जी-सूटशिवाय प्रवास करणाऱ्याना बेहोशी आणि ब्लॅकआउट सारख्या समस्या उद्भवू लागल्या.

G सूटची गरज
जी-सूट घातल्याने लढाऊ विमानात उच्च वेगाने उड्डाण करताना पायलटच्या शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामुळे ब्लॅकआऊट, बेशुद्धी यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. खरं तर, साधारणपणे 1G (गुरुत्वाकर्षण शक्ती) जमिनीवर अनुभवली जाते.

मानवी शरीर 3g पर्यंतच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा सामना करू शकतो आणि एका फायटर क्रूला 4g ते 5g पर्यंतच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीत G सूट कामी येतो आणि पायलटच्या शरीरात रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो. याचे वजन साधारण 3 ते 4 किलो असते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...