spot_img
अहमदनगरतहसीलदार गायत्री सौंदाणे यांची धडाकेबाज कारवाई! अखेर 'तो' रस्ता वहिवाटीसाठी खुला

तहसीलदार गायत्री सौंदाणे यांची धडाकेबाज कारवाई! अखेर ‘तो’ रस्ता वहिवाटीसाठी खुला

spot_img

सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण ते हिंगणी रस्ता (बेलवंडी फाट्यापर्यंत) अनेक वर्षापासून बंद होता. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. या रस्त्यालगत शेतकरी दिपक खंदारे यांची ५ एकर शेती अनेक वर्षापासून पुर्णपणे बंद होती. शेतामध्ये डाळींब, पेरू, शेडनेट हाऊस व शेततलाव हि सर्व पिके रस्त्याअभावी सोडून द्यावी लागली त्यामुळे खंदारे यांची आर्थिक व मानसिक हानी झाली. अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हा रस्ता खुला झाल्याने तहसीलदार गायत्री सौंदाणे यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

अतिक्रमण धारकांना विनंती करूनही सदरचा रस्ता खुला होत नव्हता. अखेर दिपक प्रभाकर खंदारे ( रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर ) यांनी दि.२६ मार्च २०२१ रोजी दाखल केलेला मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६ चे कलम ५(२) अन्वये रस्ता केस क्र.१८०/२०२२ पूर्वापार वहिवाट रस्ता प्रतिवादी यांनी अडविलेला सदर रस्ता खुला करून मिळणेबाबत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पारनेर ज्योती देवरे यांच्याकडे दावा दाखल केला होता, परंतु ४ वर्षामध्ये अनेक तहसीलदारांच्या बदल्या झाल्या. त्यामुळे रास्ता खुला करण्यात विलंब होत होता.

अखेर विद्यमान तहसीलदार गायत्री सौंदाने यांनी रास्ता दावा क्र.१८०/२०२२ दि.२६/०७/२०२४ च्या आदेशानुसार रस्ता वाहीवाटीसाठी खुला करून देणे बाबत आदेशित केले, सदर रस्त्याचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही दि.१९ ऑक्टोबर २०२४ रोजी वाडेगव्हाणचे मंडळाधिकारी एम बी. गायकवाड , पारनेरचे मंडळ अधिकारी जवळा काळे, मंडळ अधिकारी जयसिंग मापरी, वाडेगव्हाणचे कामगार तलाठी अशोक लांडे तसेच भूमिअभिलेखचे अधिकारी व पथक सुपा पोलीस स्टेशनचे अधिकारी लांडगे, मोहारे यांच्या संयुक्त पथकाच्या कारवाईने सदरचा रस्ता खुला करून दिला.

अनेक वर्षांच्या लढ्याला यश
अनेक वर्षापासून हा रस्ता अतिक्रमण विळख्यात होता. महसूल अधिकारी,भुमिअभिलेख अधिकारी तसेच पोलिस बंदोबस्तात संयुक्त कारवाईने अनेक वर्षांच्या लढ्याला यश आले असून शेतकऱ्यांना हा रस्ता वाहिवाटीसाठी खुला झाला आहे. अजूनही रस्त्यावर काही अतिक्रमणे आहेत ती काढण्यासाठी लवकरच लढा दिला जाईल.
– दीपक प्रभाकर खंदारे ( राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शेतकरी)

शेतरस्ता चळवळीत सहभागी व्हावे
शीवपाणंद शेतरस्ते खुले व्हावेत यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयावर धडक मोर्चे काढण्यात येत आहेत. इंग्रजांच्या काळातील हे रस्ते आजही जसेच्या तसेच आहेत यामुळे भावकीत, शेतकऱ्यांमध्ये भांडणे असे अनेक प्रकरणे न्यायालयात सुरू आहे. पर्यायाने आजही हे शेतरस्ते बंद असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी शीवपाणंद शेतरस्ता चळवळीत सहभागी व्हावे.
– शरद पवळे, शीवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...