spot_img
ब्रेकिंगMaratha Reservation : हजारो लोकांसह जरांगे मुंबईकडे ! अश्रू अनावर, म्हणाले,...

Maratha Reservation : हजारो लोकांसह जरांगे मुंबईकडे ! अश्रू अनावर, म्हणाले, मी असेन-नसेन, मात्र..

spot_img

जालन।। नगर सहयाद्री

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज शनिवारी मुंबईकडे कूच करणार आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करत सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी गावात मराठा बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. हे सर्व मुंबईकडे निघणार आहेत. यावेळी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

ते म्हणाले, सात महिने आम्ही वेळ दिला होता; मात्र यापेक्षा आणखी सरकारचे मराठा समाजाने काय ऐकायचे? मुंबईला गेल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे गावागावातून मुंबईच्या दिशेने निघणार्‍या मराठा पोरांच्या पाठीमागे उभे राहा. तुमच्या लेकराला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून मुंबईच्या दिशेने झुंज द्यायला चाललोय. एकाही मराठ्यांनी घरी न राहता आपली ताकत २६ जानेवारीला दाखवून दिली पाहिजे, असे जरांगे म्हणाले.

उपोषणामुळे माझे शरीर साथ देत नाही. मी असेन-नसेन माहित नाही; मात्र मराठा समाजाची एकजूट फूटू देऊ नका. तसेच समाजाशी चर्चा करुन आजपासूनच आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेणार असल्याचेही जरांगे म्हणाले. आरक्षणासाठी मी माझा जीव पणाला लावण्याचे ठरविले आहे. नोंदी सापडूनही सरकार आरक्षण देणार नसेल तर मराठ्यांच्या पोरांना मोठे करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलावे लागणार आहे.

मराठा आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून त्यापूर्वी मनोज जरांगे यांनी ‘मोठ्या संख्येने मुंबईला चला’ असे आवाहन केले. मराठा आरक्षणासाठी कधीतरी जीवाची बाजी लावायचीच असून त्यासाठी मुंबईला निघतानाच उपोषण करण्याचा निर्णय घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. २६ जानेवारीनंतर मुंबईत आमरण उपोषण होणारच आहे; पण त्यापूर्वीच मनोज जरांगे यांनी उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. ५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत. मागील ४५ वर्षांपासून मराठा समाज लढतोय. करोडोंच्या संख्येने समाज असताना आणि अनेकांनी बलिदान दिले असताना सरकार निर्दयीपणे वागत आहे.

नोंदी न मिळालेल्या लोकांना आरक्षण दिले आणि गोरगरीब मराठ्यांची पोर मरायला लागली तरीही हक्काचे आरक्षण देऊ शकत नाही, याच्यापेक्षा निर्दयीपणा काय आहे? असा सवाल जरांगे यांनी विचारला. आमच्या महिलांवर लाठीहल्ला झाला तरीही आम्ही संयमाने लढतोय. मुंबईला जाण्याची घोषणा करुन एक महिना झाला तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही. हा अन्यायाचा कळस आहे, असे सांगताना जरांगे यांचा कंठ दाटून आला व अश्रू अनावर झाले.

मराठा आंदोलक शनिवारी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. शनिवारी दुपारनंतर मुख्यमंत्र्याचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. बैठकीला मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीत मराठा आरक्षणाच्या मु्द्यावर अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...