WTC Points Table after Perth Test: पर्थ टेस्टमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. पर्थच्या ऑप्टस स्टेडिममध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणारी टीम इंडिया पहिली टीम ठरली आहे. इतकंच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचा ताज पटकावला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सिरीजनंतर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती, मात्र ऑस्ट्रेलियाला खाली खेचत पुन्हा एकदा भारताने नंबर १ चा मुकूट काबिज केलाय.
पर्थमध्ये झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरलीये. याव्यतिरिक्त पॉईंट्स टेबलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पर्थमधील ऑप्टसमध्ये झालेल्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाला प्रथमच पराभव पत्करावा लागला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पर्थ टेस्ट सामन्यानंतर भारत 61.11 च्या विजयाच्या टक्केवारीसह WTC पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाची टीम 57.59 च्या विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर पोहोचलीये. श्रीलंकेची टीम सध्या तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची विजयाची टक्केवारी ५५.५६ आहे. तर न्यूझीलंड ५४.५५ टक्के विजयासह चौथ्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेची टीम पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 54.17 असून इंग्लंडची टीम ४०.७९ टक्के विजयासह सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान सातव्या स्थानावर असून त्यांची टक्केवारी केवळ 33.33 आहे. यानंतर इंग्लंडची टीम असून 27.50 टक्के विजयाच्या टक्केवारीसह 8व्या स्थानावर आहे. पर्थमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचला आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पर्थ टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 295 रन्सने पराभव करून इतिहास रचला.