spot_img
अहमदनगरशिक्षक बनला भक्षक!, खाजगी कोचिंग क्लासमध्ये घडला संतापजनक प्रकार; 'त्यांनी तिला..'

शिक्षक बनला भक्षक!, खाजगी कोचिंग क्लासमध्ये घडला संतापजनक प्रकार; ‘त्यांनी तिला..’

spot_img

बीड । नगर सहयाद्री
बीड जिल्ह्यातील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक छळ आणि छेडछाडाच्या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्याविरोधात पोस्को कायद्यान्वये बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेच्या विरोधात बीडमध्ये आज बंदची हाक देण्यात आली होती, पण आरोपी शिक्षकांना अटक झाल्यामुळे बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. बीड न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा “राईट हॅन्ड” असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “एका अल्पवयीन मुलीवर जर अत्याचार होत असेल तर माझी प्रचंड संतप्त भूमिका आहे. मी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी बीडच्या एसपींशी चर्चा केली आहे. मुलीच्या पालकांशीही संपर्क साधला आहे. जिल्ह्यात अशा इतर केसेस असल्यास त्यांचा देखील शोध घेऊन संपूर्ण तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडालीआहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...