spot_img
ब्रेकिंगशिक्षकानेच विद्यार्थिनीची लुटली अब्रू, गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोज, मुलीचा मृत्यू

शिक्षकानेच विद्यार्थिनीची लुटली अब्रू, गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोज, मुलीचा मृत्यू

spot_img

यवतमाळ –
शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना यवतमाळमधून समोर येत आहे. प्रायव्हेट ट्यूशनच्या नावाखाली शिक्षकानं विद्यार्थिनीवर जबरदस्ती केली. तसेच लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडिता गर्भवती राहिली. त्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. तिनं अतिप्रमाणात गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्या. यामुळे तिची प्रकृती खालावली. तिचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. या प्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

यवतमाळमधील एका गावात आरोपी खासगी शिकवण देत होता. पीडित मुलगी १६ वर्षांची होती. आरोपीकडे पीडित मुलगी शिकवण घेत होती. मात्र, शिक्षकाचा त्याच्या विद्यार्थिनीवर वाईट नजर होती. त्यानं पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तसेच तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. आरोपी वारंवार शिकविण्याच्या बहाण्यानं तिला घरी बोलावत होता.

तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. गोळ्यांचा ओव्हरडोज झाल्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले. तसेच ती आजारी पडली. तिची प्रकृती खालावली. पीडितेनं कुटुंबियांना प्रकृती ढासळली असल्याची माहिती दिली.

अल्पवयीन मुलीला तातडीने नांदेड येथील शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपास करत शिक्षकाला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रेमाच्या नाटकात शिक्षिका झाली फसवणुकीची शिकार; चहावाल्या प्रियकराने घातला २२ लाखांला गंडा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- लग्नाचे खोटे वचन देत एका ४२ वर्षीय शिक्षिकेची तब्बल २२...

अखेर सुप्यातील तिसरा बिबट्या जेरबंद! एक बिबट्या व दोन पिल्लाचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

सुपा । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील सुपा शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर...

शहरातील व्यापारी संकुलाला भीषण आग; आठ दुकानदारांचे व्यवसाय जळून खाक, कुठे घडली घटना?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील वागजोई चौकात माजी सरपंच पोपटराव आबा...

हिंदू नाही, बळीराजा संकटात! शेतकऱ्यांसाठी रोहित पवार मैदानात, सोशल मिडीयावर शेअर केली ‘ती’ पोस्ट..

Rohit Pawar: राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांत...