अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
प्रेमदान चौकातील एका लॉजमध्ये एका 41 वर्षीय विवाहित महिलेला सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली.सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पीडितेने धाडस करत एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत 19 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली.
त्यानुसार सोमनाथ शहाजी पाटोळे (रा. सोनई, ता. नगर, जि. अहिल्यानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी 2023 ते 6 ऑगस्ट 2025 दरम्यान आरोपीने पीडितेला वेळोवेळी धमकावून, भीती दाखवून तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. पीडितेचे छायाचित्र काढून तुझी बदनामी करेन,अशी धमकी देत ती सोशल मीडियावर आणि तिच्या पतीकडे फोटो पाठवण्याची भीती दाखवली.
कोणाला सांगितलेस तर तुला, तुझ्या पतीला आणि मुलींना जिवंत ठेवणार नाही,असेही आरोपीने तिला धमकावलेचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.अद्याप आरोपी फरार असून सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करत आहेत.