अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :-
केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँक मॅनेजर अरुधंती अशोक पुजारी (37) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 30 अकटोबर रोजी बँकेच्या शेजारी असलेल्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड टाकुन पैसे काढण्याची प्रोसिजर केली असता एटी एम मधुन पैसे मिळाले नसल्याची तक्रार तीन खातेदारांनी केली होती. खातेदारांनी ऑनलाईन तक्रार नोंदविलेनंतर खाते चेक केले असता पैसे काढण्याची प्रोसिजर पूर्ण झाल्याची निदर्शनास आली.
त्यांनुसार बँकेने सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना एका अज्ञात इसमाने एटीएम मशिनला पैसे येण्याचे मार्गावर पटी लावल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर खातेदार त्याच एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आल्याचे दिसुन आले. परंतु अज्ञात इसमाने एटीएम मशिनला पटटी चिटकवल्यामुळे खातेदारांना पैसे मिळाले नाही.
खातेदार काहीवेळाने एटीएम मधुन बाहेर गेल्यानंतर अज्ञात इसम एटीएममध्ये प्रवेश करत मशिनला चिटकवलेली पटटी काढुन रोख रक्कम परस्पर काढुन घेवुन बँकेची फसवणुक केल्याचे उघडकीस आली आहे. त्यानुसार याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना देण्यात आले आहे. त्या फुटेजनुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.