spot_img
ब्रेकिंगधारदार शस्त्रांनी वार! अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाना संपवलं...

धारदार शस्त्रांनी वार! अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाना संपवलं…

spot_img

Maharashtra Crime News: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे विधानसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये सचिन कुर्मी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक मुंबईमच्या भायखळा परिसरामध्ये घडली आहे. या हल्ल्यामध्ये सचिन कुर्मी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे ही थरारक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सचिन कुर्मी हे शुक्रवारी (ता. ४ ऑक्टोबर) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास म्हाडा कॉलनी परिसरात थांबले होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सचिन कुर्मी हे गंभीर जखमी झाले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा कुर्मी हे जखमी अवस्थेत होते.

पोलिसांनी त्यांना तात्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सचिन कुर्मी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्यावर कोणी हल्ला केला? या हल्ल्याचे कारण काय? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...