spot_img
ब्रेकिंगहे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला...,...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी आज मुंबईत मनसे आणि महाविकास आघाडीच्यावतीने सत्याच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी यावेळी मतदार यांद्यांमध्ये घोळ असल्याचं पुरावेही सादर केले.

राज ठाकरे म्हणाले, आजचा मोर्चा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजण्याचा आणि दिल्लीला समजावून सांगण्याचा मोर्चा आहे. माझ्यासह सर्वांनीच यावर भाष्य केलंय, बोलले आहेत. तोच विषय नव्याने सांगण्यासारखा काहीच नाही. तुम्ही सगळे मोठ्या ताकदीने इथं जमलात याबद्दल आभार मानतो.

पुढे त्यांनी सांगितलं की, हा फार मोठा विषय नाही आहे, आम्ही बोलतोय, उद्धव ठाकरे बोलतायत, शरद पवार साहेब बोलतायत. दुबार मतदार आहेत. शेकाप, कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेसचे लोकही बोलतायत. इतकंच नव्हे तर भाजपचे लोकही बोलतायत की दुबार मतदार आहेत. सगळेच म्हणतायत तर अडवतंयत कोण? निवडणूक घेण्याची घाई का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.

साधी गोष्ट आहे मतदारयाद्या साफ करा, त्या साफ केल्यानंतर, पारदर्शक केल्यावर जेव्हा निवडणवुका होतील तेव्हा यश, अपयश कुणाचं ते समोर येईल, दोन तीन गोष्टी तुम्हाला दाखवायला आणल्या आहेत. साडेचार हजार मतदार आहेत. ४५०० मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली इथल्या मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केलंय. इतक्या लोकांनी दोन्ही ठिकाणी मतदान केलंय. फक्त तीन नावं आणली आहेत. असे लाखो लोक आहेत जे मतदानासाठी वापरले गेले, असा दावाही राज ठाकरे यांनी केला.

लोक म्हणतात की आम्ही आरोप करतो पण पुरावे कुठे? त्यांच्यासाठी आज मी पुरावी देखील आणले आहेत. पुढे त्यांनी बाजुच्या स्टेजवरील दुबार मतदान याद्यांचा ढीगही दाखवला. त्यावेळी त्यांनी काही मतदारसंघातील दुबार मतदार असल्याची आकडेवारीही सादर केली.

सावध राहा, नाही तर अॅनाकोंडा येईल, उद्धव ठाकरेंचा इशारा
“माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रानंतर राज्यातील राजकीय पक्षांची एकजूट पहिल्यांदा झाली असेल. ही विरोधी पक्षांची एकजूट नाही. तर लोकशाहीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्यांची एकजूट आहे. मतचोरी करणाऱ्यांना सांगतो आज ठिणगी बघत आहात. या ठिणगीची आग कधी होईल सांगता येत नाही. तुमच्या बुडाला आग लागेल. शोलेत एक डायलॉग आहे. दूर गाव में बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आयेगा. तसं सांगतो, सावध राहा. नाही तर अॅनाकोंडा येईल” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

“राजने डोंगरच उभा केला. तरीही निवडणूक आयोग ऐकत नाही. निवडणूक आयोग यांचा नोकर आहे. मी अॅनाकोंडा का म्हणतोय. यांची भूक थांबत नाही. आपला पक्ष, निशाणी चोरली. वडील चोरत आहेत. ते पुरत नाही म्हणून मतदान चोरी करत आहेत. सर्व आले. पण सत्ताधारी आले नाही” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

शौचालयातील लोकांची नावेही तपासा
“मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, तुम्ही आमचा पर्दाफाश करा. एकदाचं करूनच टाका. दूध का दूध पानी का पानी होऊ द्या. मुख्यमंत्री असं म्हणत आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना मतचोरी मान्य आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे. देशाला दिशा देत आहे. आपण पक्ष बाजूला ठेवून एकवटलो आहोत. आम्ही जे आता करत आहोत, मतदार यादीत नाव आहे की नाही तपासा. तुमच्या घरावर कुणाचे नाव तर नाही ना ते तपासा. शौचालयातील लोकांची नावेही तपासा” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन
मतदान चोरीच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र येऊन लढा देतोयच, पण आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनेही जागं झालं पाहिजे. त्यामुळे मतचोर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला फटकवा असं उद्धव ठाकरे म्हणाले. बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत, आता न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे असंही ते म्हणाले. मनसे आणि महाविकास आघाडीकडून मुंबईत निवडणूक आयोगाच्या मतदारयादीतील भ्रष्टाचाराविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी लोकांना जागृत राहण्याचं आवाहन केलं. आम्ही लोकशाही मार्गाने यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच, पण आता जनतेनेही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून होत आहे. त्यामुळे हे जे काही चाललं आहे थांबवलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज एवढे सगळे धडधडीत पुरावे दाखवले, तरीही निवडणूक आयोग त्यावर काहीही कारवाई करत नाही. आपले पक्ष चोरले, नाव चोरले… तेवढंही पुरेसं नाही म्हणून आता मतदारही चोरले जात आहेत.

महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो, आजही महाराष्ट्र एकवटला आहे. ज्या गोष्टी आता आम्ही विरोधी पक्ष करत आहोत, तसंच सगळ्या मतदारांनीही जागृत व्हावं आणि मतदार याद्या तपासा. आपलं नाव त्यामध्ये आहे की नाही हे तपासा आणि तुमच्या घराच्या पत्त्यावर तुम्हाला माहिती नसलेले किती मतदार आहेत ते तपासा.

उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा नावाने एक ऑनलाईन अर्ज निवडणूक आयोगाकडे करण्यात आला. घरातील मतदार रद्द करण्यासाठी त्याने अर्ज केला होता. तो अर्जही बोगस आणि मोबाईल नंबरही खोटा असल्याचं उघड झालं. त्यावर निवडणूक आयोगाने आमच्याकडे येऊन त्याची खातरजमा केली. माझ्या नावाने खोट्या नंबरने ओटीपी करण्याचा प्रयत्न केला गेला, तो 23 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. यामागे काही षडयंत्र आहे का हे तपासावं लागेल. आम्ही लोकशाही मार्गाने यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच, पण आता जनतेनेही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून होत आहे. त्यामुळे हे जे काही चाललं आहे थांबवलं पाहिजे. या सगळ्याचे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत. निवडणूक आयोग तर लाचार झालाच आहे, पण आता न्यायालय काय करतंय ते पाहू. न्यायालय आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा आहे. आम्ही पुढे जात असताना तुमची साथ हवी आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बोगस मतदार घुसवण्यात आले आणि मतदान घेण्यात आलं. मग जो खरा मतदार दुपारी उन्हात उभारून मतदान करतो त्याच्या मताला काही किंमत आहे की नाही? मतदार घरोघरी जाऊन तपासा, त्या ठिकाणी जर दुबार तिबार मतदार सापडले तर त्यांना तिथेच फोडून काढा. त्यांना बडव बडव बडवायचं आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत.

‘सत्याचा मोर्चा आयोगाविरोधात, मग सरकार का नाचतेय? अविनाश जाधवांचा भाजपवर थेट हल्लाबोल
आमचा निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आहे. यामध्ये सरकारचा काय संबंध? सरकार का मधे मधे नाचत आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे, तर भाजपचा आंदोलन करण्याचा काय संबंध येतो, असा टोला मनसे नेते अविनाश जाधव यांनी लगावला आहे. भाजपचे घर आणि दुकान हे निवडणूक आयोगाच्या मदतीनेच चालतेय, त्यामुळेच ते आमच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आयोगाच्या मदतीने अनेकजण निवडणूक आलेले नेते आहेत, असा टोला जाधव यांनी केला. अविनाश जाधव यांनी नेमकं काय म्हटले.. मुंबईत आज निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा सत्याचा मोर्चा निघणार आहे…या मोर्चात शरद पवारांसह, ठाकरे बंधू, काँग्रेस, भाकप, माकप पक्ष सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरात वातावरण निर्मितीसाठी ठाकरेंसेना, राष्ट्रवादी, मनसेचे झेंडे लावण्यात आलेत. फॅशन स्ट्रीटपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

खोटेपणा उघड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात; शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले की, ‘देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंधू भगिनी. आजचा मोर्चा मला जुन्या गोष्टी आठवण करून देतो. मला आठवतंय १९७८-८९ या काळात महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात असाच मोर्चा निघाला होता. काळा घोडा आणि त्याचा परिसर तिथे मोर्चे एक प्रकारचा विचार समन्वय दाखवणारे मोर्चे होते. तुम्ही सर्वांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली. त्यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, त्याची आठवण होते. आज महत्त्वाचा विषय आपण हातात घेतला. आपण स्वतसाठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतोय की लोकशाहीत संविधानाने तुम्हा आम्हाला अधिकार दिला त्याची जतन करणं याची वेळ आली आहे.

निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत विशेषत: विधानसभेच्या निवडणुकीत जो प्रकार झाला, त्यामुळे सामान्य माणसाला संसदीय लोकशाही यावरचा विश्वासाला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. आता या ठिकाणी उत्तमराव जानकर सोलापूर हे आमदार यांना जे अनुभव आले. त्यांनी अनुभव सांगितला. त्याचा गैरवापर केला जात आहे. याला तोंड द्यावं लागेल. राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकीत संघर्ष असू शकतो. पण या सर्व गोष्टी विसरून आपल्याला एक व्हावं लागेल. आणि या देशातील मतांचा अधिकार, लोकशाहीतील हा अधिकार जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. याचा निर्धार केला पाहिजे.

काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या. इथे बनावट आधार कार्ड मिळतं. माहिती दिली. कलेक्टरला सांगितलं. सिद्ध करून द्या हे आव्हान आलं. डेमो दाखवला. हे दाखवून हा आरोप ज्याने सिद्ध केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. खोटेपणा उघड करणाऱ्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ शासन या सर्वांना संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची माझी जबाबदारी आहे की काहीही करा मतदानांचा हक्क सांभाळणार.

आमचे पक्ष वेगळे आहेत. विचारधारा वेगळी आहे. कधी मतभेद असतात. पण देशातील संसदीय लोकशाही टिकवायची असेल आणि मतांचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला मला एक व्हावे लागेल. व्यासपीठावरील नेत्यांच्या वतीने आम्ही हा निकाल घेतला. मतचोरी थांबवू आणि लोकशाही कशी टिकेल याची खबरदारी घेऊ. एवढंच सांगतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

विधानसभेची मतदारयादी स्थानिक स्वराज्य संस्थेला नको ; बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले पहा

संगमनेर / नगर सह्याद्री - “राहुल गांधी यांनी मतचोरी होत असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर...