spot_img
महाराष्ट्रशहरात हिट अँड रन प्रकरण! आ. संग्राम जगताप तात्काळ नगरला; मयत तरुणाच्या...

शहरात हिट अँड रन प्रकरण! आ. संग्राम जगताप तात्काळ नगरला; मयत तरुणाच्या कटूंबाची घेतली भेट

spot_img

आ. जगताप यांनी घेतली हिट अँड रन घटनेतील मयत तरुणाच्या कुटुंबियांचे भेट
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील महात्मा फुले चौकामध्ये सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका चार चाकी चालकाचा आपल्या गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या बाजूला उभे असणाऱ्या नागरिकांना चिरडल्याची घटना घडली, यामध्ये सारसनगर येथील कानडे मळ्यातील रवींद्र रमेश कानडे या 30 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान आमदार संग्राम जगताप यांना ते मुंबईत असताना या घटनेची माहिती मिळली असता ते तात्काळ नगरला आले व त्यांनी कानडे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन करत हिटअँड रन करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

या अशा घटनेमध्ये एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरुष दुर्दैवी मृत्युमुखी पडल्यास त्या कुटुंबावर मोठे संकट कोसळत असते त्यांचा आधार निघून जाण्याचे काम होत असते, अशा घटना वारंवार घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

याबाबत विविध उपाययोजना होणे गरजेचे आहे यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले, यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एमआयडीसीत टोळक्याचा तरूणावर कोयत्याने हल्ला; नेमकं काय घडलं

अहिल्यानगर | नगर सह्याद्री एमआयडीसी परिसरात एका टोळयाने तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली...

ढगाळ वातावरण! कांदा उत्पादक चिंतेत; काय होणार परिणाम

श्रीगोंदा | नगर सह्याद्री श्रीगोंदा तालुयामध्ये कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. परंतु  सध्या ढगाळ...

काळजी घ्या! उष्माघाताचे ‘इतके’ रुग्ण; आरोग्य विभागाने दिला हा इशारा

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी मार्च महिन्याच्या...

चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, अजितदादादांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ, काय म्हणाले पहा

बीड / नगर सह्याद्री - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या वक्तव्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे दोन्ही गट...