ओबीसी समाजातर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राशीन येथील करमाळा रोड येथे ’महात्मा जोतिबा फुले चौक’ असा नामफलक लावण्यात आला होता. मात्र गेल्या रविवारी रात्री काही समाजकंटकांनी नामफलकाची विटंबना करीत मोडतोड केली. कर्जत राशीन येथील महात्मा जोतिबा फुले चौक या नामफलकाची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन अहिल्यानगर ओबीसी व्हिजेएनटी संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना देण्यात आले.
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले, ज्येष्ठ नेते ॲड. अभय आगरकर, उपमहापौर अनिल बोरुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, ॲड. धनंजय जाधव, शेंडीच्या सरपंच प्रयागाताई लोंढे, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माउली मामा गायकवाड, माळी महासंघाचे अध्यक्ष भूषण भुजबळ, समता परिषदेचे रामदास फुले, बाबासाहेब सानप, काका शेळके, किरण बोरुडे, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर रासकर, पंडितराव खरपुडे, प्रकाश इवळे, निशांत दातीर, अर्जुन बोरुडे, नितीन भुतारे, परेश लोखंडे, विशाल वायकर, संजय सागांवकर, साहेबराव विधाते, सुरेश आंबेकर, डॉ. रणजीत सत्रे, अनिल इवळे, विनोद पुंड, सुधीर पुंड, बाबासाहेब दळवी, जालिंदर बोरुडे, सुनील जाधव, रमेश चिपाडे, ब्रिजेश ताठे, मच्छिंद्र बनकर, अनंत गारदे, गणेश कानगावकर, सौ. रोहिणी बनकर, नितीन डागवाले, सुधीर पुंड, भानुदास बनकर, मनोज भुजबळ, अशोक ताठे, विवेक फुलसौंदर, नंदकुमार नेमाणे, संदीप दळवी, राजेंद्र बोरुडे, मनोज फुलसौंदर, रोहिदास हराळे, राहुल साबळे, योगेश फुलारी, तुषार फुलारी ,योगेश धाडगे, शिवाजी धाडगे, शरद मुर्तडकर, देविदास खामकर, रेणुका पुंड, रोहिणी बनकर, कल्याणी गाडळकर, आश्विनी दळवी आदी उपस्थित होते
निवेदनात पुढे म्हटले की, थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी सर्व समाजासाठी शिक्षणाची द्वारे खुली केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावून शिवजयंती मोठ्या पद्धतीने साजरी केली आहे. तसेच स्त्री शिक्षणाचा पुढाकार घेऊन महिलांना शिक्षण देण्याचे महान कार्य केले आहे. या थोर महापुरुषांच्या नावाने महात्मा जोतिबा फुले चौक असे नामकरण करण्यात आले होते; परंतु चौकाची विटंबना करणाऱ्या घटनेमुळे अहिल्यानगर येथील ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सर्व ओबीसी समाज संतप्त झाला आहे. या घटनेतील समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी व्हिजेएनटी जनमोर्चाच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.