spot_img
अहमदनगरसाहेब गांभिर्याने घ्या!! पारनेरच्या ग्रामस्थांनी 'असा' मांडल्या व्यथा? अत्ता 'त्यांचा' बंदोबस्त होणार

साहेब गांभिर्याने घ्या!! पारनेरच्या ग्रामस्थांनी ‘असा’ मांडल्या व्यथा? अत्ता ‘त्यांचा’ बंदोबस्त होणार

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा, आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल अशा पद्धतीने आरोपपत्र दाखल करावे अशी मागणी पारनेर ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्याकडे केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते पारनेर महाविद्यालय रस्त्यावर, बसस्थानक परिसरात हुल्लडबाजीमुलींची छेडछाड करणार्‍या तरुणांवर कठोर कारवाई करावी, बसस्थानक परिसरात पोलिस चौकी सुरू करावी अश्या विविध मागण्या गोळीबाराच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ शुक्रवारी पारनेर पोलिस ठाण्यावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर झालेल्या सभेत करण्यात आल्या. दरम्यान घटनेच्या निषेधार्थ आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

पारनेरचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ, माजी तालुकाध्यक्ष भाजपा वसंत चेडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, बाजार समितीचे संचालक शंकर नगरे, पत्रकार संजय वाघमारे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर, शैलेंद्र औटी, नंदकुमार देशमुख, नगरसेवक डॉ. बाळासाहेब कावरे, योगेश मते, संजय मते, निलेश खोडदे, नगरसेवक भूषण शेलार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसिम राजे, साहेबराव देशमाने, दत्तात्रेय आंबुले, ऋषीकेश गंधाडे यांच्यासह शहरातील व्यावसायिक सहभागी झाले होते.

महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी वक्त्यांनी पारनेर शांतताप्रिय शहर आहे. गोळीबाराचा प्रकार पहिल्यांदाच झाला आहे. शहर दहशतीखाली आहे. शहरात विशेषतः बसस्थानक परिसर, महाविद्यालय रस्त्यावर हुल्लडबाज तरुणांकडून वारंवार शांतताभंग केला जातो. मुलींची छेडछाड केली जात असुन हाणामारांचे प्रमाण वाढत आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलावीत हुल्लडबाज तरुणांवर कठोर कारवाई तसेच बसस्थानक परिसरात पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

कारवाईवेळी हस्तक्षेप नको
गोळीबार प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. एका अल्पवयीन मुलासह दोन आरोपींना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीला नाशिक येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. बसस्थानक परिसरात पोलिस चौकी सुरू करण्यात येईल. हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्यात येईल. मात्र अशा कारवाईच्या वेळी नागरिकांनी हस्तक्षेप करू नये. गोळीबार प्रकरणातील साक्षीदारांनी निर्भयपणे पुढे यावे.
-समीर बारवकर, पोलीस निरीक्षक, पारनेर

आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत कोठडी; दोघे फरार
शिवसेना नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्टा लावुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा करून ३ जण ताब्यात तर २ जण फरार आहेत. यापैकी आरोपी महेश राजू खेडेकर, ओमकार गणेश मुळे यांना २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी सपोनि प्रमोद वाघ यांनी दिली आहे. गावठी कट्टाने पठारेंना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रांजणगाव मशीद येथील अल्पवयीन तरुणाला अहमदनगर येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....