spot_img
ब्रेकिंगएमआयडीसीतील कंपनीवर मारला ताबा? गुन्हा दाखल

एमआयडीसीतील कंपनीवर मारला ताबा? गुन्हा दाखल

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
येथील एमआयडीसीतील एका कंपनीवर बुलडोझर चालवून गेट व सेक्युरीटी कॅबीन तोडून ताबा मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरची घटना 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली असून या प्रकरणी 10 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

व्यावसायिक अर्चना संजय पुगालिया (वय 49 रा. अरिहंत शांतीविहार सोसायटी, सारसनगर, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. प्रकाश मलय्या शेरेगर (रा. 110 बी तेजपाल इस्टेट, अंधेरी कुर्ला साकीनाका, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. फिर्यादी यांच्या मालकीची नागापूर एमआयडीसीतील प्लॉट बी 90 व बी 52 येथे कंपनी आहे.

29 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास प्रकाश मलय्या शेरेगर व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांचा कायदेशीर ताबा असलेल्या प्लॉटवर कोणतीही परवानगी न घेता बेकारयदेशीरपणे बुलडोझर चालविला. त्याच्या सहाय्याने कंपनीच्या गेटचे व सेक्युरीटी कॅबीन तोडून नुकसान केले. फिर्यादी व कंपनीतील कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. प्लॉटचा ताबा घेण्याकरीता धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...