अहिल्यानगर | नगर सह्याद्री
गुंड प्रवृत्तीच्या व गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या चेतन रविंद्र निदाणे (वय 26 वर्षे, रा. कोपरगाव) यांच्यावर चॉपर, तलवारीने जीव घेणा हल्ला करणारे आरोपी जितू सुरेश चव्हाण व रोहन जय चव्हाण व इतर आरोपीला तात्काळ अटक करावी. चव्हाण यांच्यावर मोक्कातंर्गत कारवाई करण्याची मागणी नालेगाव येथील म्युनसीपल कॉलनी राहणारे समस्त नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिले. यावेळी परिना चव्हाण, सुनिता खोकर, वैशाली कोरडे, माधवी निदाणे, शीला पटीना, प्रिया निदाणे, शितल सारसर, कोमल वाणे, नयना वाणे, नीतू बेग, रूपा बागडी, ऐश्वर्या सोहत्रे, मोहिनी जेधे, निर्मला अठवाल, अनिता चव्हाण, शितल सारसर, नयना चावरे, लक्ष्मण सारसर, अनिल वाणे, किरण जरे, गणेश भुजबळ, प्रशांत दळवी, अमोल गोरे, आदर्श साळुंके, गणेश पवार, आयान शेख, योगेश वाघमारे, हर्षल सारसर, किरण रोकडे, स्वप्निल वारे, अंबादास बडे, मुन्ना शेख, तुषार बडे, सागर चौरे, हर्ष शेलार, सुनील नेटके, सार्थक पवार, अभिषेक साखरे, रोनित चव्हाण, सुजल बेग, मयूर गोयर, प्रशांत मिसाळ, सचिन काते, संजय घोडके, अभिजीत गोयर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील टांगे गल्ली येथे 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:00 वाजता गंभीर मारहाणीचा प्रकार घडला आहे. फिर्यादी चेतन रविंद्र निदाणे (वय 26 वर्षे, रा. कोपरगाव) यांच्यावर तीन आरोपींनी जुने वाद असल्याने प्राणघातक हल्ला केला. फिर्यादी लग्न समारंभासाठी नालेगाव येथे आले होते. त्यावेळी आरोपी जितू सुरेश चव्हाण (वय 45 वर्षे), रोहन जय चव्हाण (वय 25 वर्षे) आणि दाद्या उर्फ सुनिल जाधव (वय 27 वर्षे) यांनी चेतन निदाणे यांच्यावर चॉपर आणि तलवारीसह प्राणघातक हल्ला केला. फिर्यादीने प्रतिकार केल्याने मानेवर होणारा वार त्यांच्या हाताला लागला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने तलवारीने वार करून पाठीवर जखम केली, तर तिसऱ्या आरोपीने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार आहेत.