पारनेर । नगर सहयाद्री:-
राज्य रयतेचे जिजाऊंच्या शिवबाचे या टॅगलाईनखाली आयोजित स्वराज्य सप्ताह म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जागर आहे, असे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत असताना आजच्या बाल आणि युवा पिढीत शिवरायांचे विचार भिनवून तळागाळात पोचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने स्वराज्य सप्ताहानिमित्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभ आ. काशिनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आ. दाते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, माजी नगराध्यक्ष विजय औटी, जिल्हा उपाध्यक्ष कापसे सर, महिला तालुकाध्यक्ष सुषमा रावडे, युवक तालुकाध्यक्ष भास्कर उचाळ , युवती तालुकाध्यक्ष अपर्णा खामकर, विठ्ठल कवाद, आप्पासाहेब कळमकर, समीर झगडे, सुधीर करंजुले मेजर आदींसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी महापुरुषांचे विचार जपणार
आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ध्यानात ठेवून प्रत्येक कामातून स्त्रीशक्तीचा सन्मान राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार करत आहेत.त्याच अनुषंगाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
– विक्रमसिहं कळमकर, तालुका अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस