परभणी | नगर सह्याद्री:-
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूचा दावा केला होता. मात्र, पोलिसांच्या मारहाणीमुळे कोठडीत त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.
याविरोधात महायुती सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. हा निर्णय महायुती सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे या प्रकरणाशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. सोमनाथ सूर्यवंशी यांची केस कोर्टात स्वत: प्रकाश आंबेडकर लढत आहेत, ते सुप्रीम कोर्टातही आज उपस्थित होते. सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतच पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. सूर्यवंशी यांच्या आईने पोलिसांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली.
प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची बाजू मांडली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळू लावत हायकोर्टाचा निर्णय कामय ठेवला. हा राज्य सरकारसाठी मोठा झटका मानला जातोय. त्यामुळे सोमनाथ यांचे कुटुंबीय आणि प्रकाश आंबेडकरांच्या लढ्याला मोठं यश मिळाले आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. हात झटकण्याचा सरकारचा प्रयत्न कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला होता. तसेच कोम्बिंग ऑपरेशनची नोंद कोर्टाने घेतली आहे. आता एसआयटी अथवा तपास अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाचा तपास करायचा, याचा निर्णय राज्य सरकार घेईल.