Allu Arjun : अभिनेता अल्लू अर्जूनच्या हैदराबाद येथील पुष्पा 2 च्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी आता अल्लू अर्जुन याला अटक केली आहे. अल्लू अर्जुन याला घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलेय. पोलिस पुढील चौकशी करत आहेत.
पुष्पा 2 हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाचा प्रिमियर शो हैदराबाद येथे पार पडला. या चित्रपटाच्या प्रिमियरला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. अल्लू अर्जुनची चित्रपटाच्या प्रिमियरला उपस्थिती असल्याने तुफान गर्दी झाली होती. रात्री ९.३० च्या दरम्यान हैदराबाद येथील संध्या चित्रपटगृहात हा शो पार पडला यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच एका महिलेचा मृत्यू झाला होता.
याचदरम्यान ४ डिसेंबर रोजी झालेल्या संपूर्ण गोंधळामुळे पोलिसांनी आज अल्लू अर्जूनला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी हैदराबाद येथील संध्या थिएटर संपूर्ण टीम आणि सुरक्षारक्षक यांच्यासह अभिनेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या टीमने प्रिमियर शोची कोणतीही माहिती पोलिसांना दिली नव्हती.
चित्रपटगृहात नेमकं काय घडलं?
रिपोर्टनुसार, रेवती यांचे संपूर्ण कुटुंब अल्लू अर्जुनचे फॅन आहेत. बुधवारी ९ वर्षांचा श्रतेज आणि त्याची बहीण सानवी यांनी चित्रपट पाहण्याचा हट्ट धरला होता. कुटुंबाने संध्या थिएटरमध्ये प्रीमियर पाहायला जाण्याचा प्लॅन केला. जिथे अल्लू अर्जुन स्वतः उपस्थित होता. दरम्यान, थिएटरमध्ये अचानक चेंगराचेंगरी झाली. यामध्ये रेवती आणि श्रीतेज गर्दीत अडकले होते.