spot_img
ब्रेकिंगनगर-दौंड मार्गावरील वाहतुक राहणार बंद? पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश,...

नगर-दौंड मार्गावरील वाहतुक राहणार बंद? पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश, कारण काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर ते दौंड जाणारे रस्त्यावर नगर- बीड रेल्वे लाईनला ओलांडणी पुलाचे बांधकामाचा तिसरा टाप्पा सुरु होत आहे. या बांधकामासाठी साईटजवळ मोठे गर्डर बसविण्यात आलेले आहेत. हे गर्डर बसविण्यासाठी मोठे क्रेन व ट्रेलर वापरण्यात येणार आहेत. हा रस्ता रहदारीचा असल्याने नगर ते दौंड या मार्गावरील कायनेटीक चौक ते अरणगाव बायपास रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश काढले असून यात आज सकाळी 8 ते 11 तारखेला रात्रीपर्यंत दौंड या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. यात कायनेटीक चौकातून दौंड रोडने अरणगाव बायपासकडे जाणारे वाहनांसाठी पर्यायी मार्ग कायनेटीक चौक केडगाव, केडगाव बायपास, अरणगाव बायपास मार्गे वळवण्यात आली आहे.

अरणगाव चौकातून कायनेटीक चौकाकडे येणारे वाहनांसाठी पर्यायी मार्ग अरणगाव बायपास केडगाव बायपास केडगाव, कायनेटीक चौक, तसेच पुणेकडून दौंड रोडला जाण्यासाठी कायनेटीक चौकात येणारे वाहनांसाठी पर्यायी मार्ग केडगाव बायपास अरणगाव बायपासने वळवण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...