spot_img
ब्रेकिंगसुपेकरांच्या व्यवसयाची साता समुद्रापार चर्चा! लाखो रुपयांची उलाढाल, ३०० कुटुंबाला मिळतोय रोजगार

सुपेकरांच्या व्यवसयाची साता समुद्रापार चर्चा! लाखो रुपयांची उलाढाल, ३०० कुटुंबाला मिळतोय रोजगार

spot_img

शरद रसाळ । सुपा
अहमदनगर पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील सुपा येथील हार फुलांचे दुकाने दसरा दिपावली सणासाठी सज्ज झाली आहेत. हार विक्रितून सुमारे ३०० कुटुंबांना रोजगार मिळत असून येथे या सणानिमीत्त लाखो रूपयांची उलाढाल होते. यातून शेकडो नागरिकांना रोजगार मिळाला आहे. महामार्गावरील सुपा येथे गेल्या अनेक वर्षापासुन हार फुलांची दुकाने आहेत. कित्येक कुटुंबाचा उदरनिर्वाह यावरच चालतो. नुकत्याच झालेल्या दशरा सणानिमित्त मोठी उलाढाल झाली.

आता दिपावली निमित्त येथील हार विक्रेते सज्ज झाले असून यावर्षी पाऊस पाणी चांगले आसल्याने विक्रेत्यांना मोठ्या उलाढालीची अपेक्षा आहे. सुपा येथील फुलहार देशभर प्रसिद्ध आहेत. या हारांना सातासमुद्रपार वर्षभर मोठी मागणी असते तर दसरा दिपावलीत तेथे राज्यभरातुन ग्राहक हार खरेदी करण्यासाठी येत असतात. झेंडू, शेवंती, गलांड्डा, निली, गुलाब, गुलछडी यांचा एकत्रीत आकर्षक फुलहार येथे बनतात. त्यांच्या किमती अगदी पन्नास शंभर रुपयांपासुन साईज व सजावट पाहून पाच ते दहा हजार रुपयांपर्यत किमती आहेत.

सुप्यातील हार एवढे आकर्षक आहेत की, या मार्गावरुन जाणारे प्रवासी हमकास या फुलहारांच्या मोहात पडतात. वहान चालकांच्या माध्यमातून येथील हार रोजच राज्याबाहेर सिमा उल्लंघन करत असतात. तर दसरा दिपावलीला मुंबई पुण्याचे व्यापारी येथे हार घेण्यासाठी येत असतात तर सुप्यातील अनेक युवक पुणे मुंबई येथे जाऊन हार फुले विकतात. रविवारी अहमदनगर फुल बाजारात झेंडू १०० ते १५० रुपये किलो दराने विकला जात होता तर शेवंती २०० ते २५० रुपये किलो तर गुलाब ४०० रुपये किलो दराने विकला जात होता. गुलाब सह इतर फुलांचे दरही वाढले आहेत तर वाढत्या मजुरीमुळे हारांच्या किंमती वाढलेल्या या वर्षी दिसून आल्या.

मागील काही दिवस पारनेर तालुक्यासह अहमनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यात फुलशेतीचे मोठे नुकसान झाल्याने याचा फुलांच्या आकारावर मोठा परिणाम झाला. सातव्या माळेपासुन काही प्रमाणात फुलांचा तुटवडा जाणवत होता. तसेच पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या मालाचेही दोन पैसे चांगले झाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहेत. फुल हार विक्रेत्यांना सद्या सुगीचे दिवस आले असून दिपावली पर्यंत फुलहारांना मोठी मागणी असते.

अतिवृष्टीमुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात
चालू वर्षी अतिवृष्टीमुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेतकऱ्यांचे फडच्या फळ जाग्यावर बसले परीणामी झेंडू व इतर हारासाठी लागणाऱ्या वस्तू महाग झाल्या. २०० रूपयांना विकला जाणारा हार ४०० रूपयांना विकावा लागतो यामुळे ग्राहक कमी झाले. दिपावली निमित्त फुले व हारांना पुन्हा मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे.
एकनाथ बाबूराव औचिते. नितीन शिंदे ( हार विक्रेते सुपा )

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Manoj Jarange Patil News : अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला...

तुमचे व्हॉट्सॲप कुठे कुठे आहे चालू? या युक्तीने कळेल क्षणार्धात

नगर सहयाद्री वेब टीम :- WhatsApp हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे, जे प्रत्येकजण...

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजणार; लवकरच मोठा निर्णय होणार?

Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला धूर चारत पुन्हा...

राज्याला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; रोहित पाटलांचा दणदणीत विजय

Politics News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती...