spot_img
अहमदनगरनगरमध्ये शिवसेना संपविण्याची सुपारी अखेर यशस्वी!

नगरमध्ये शिवसेना संपविण्याची सुपारी अखेर यशस्वी!

spot_img

उमेदवारीचा बाजार मांडणाऱ्या साजनच्या स्कीन करन्सीचा फटका महाविकास आघाडीला बसणार | मशाल हाती घेण्यासाठी शिवसैनिक नव्हे कारखाना शिक्षण संस्थेचे कर्मचारी
|
ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये असंतोष | बारापैकी एक जागा अन्‌‍ ती देखील विकलेली | शरद पवारांसह बाळासाहेब थोरातांनीही राऊतांसमोर हात टेकले

सारिपाट / शिवाजी शिर्के-
स्थापनेपासून नगर जिल्ह्यातील साखर सम्राटांच्या विरोधात आवाज उठवत ग्रामीण भागात शिवसेना वाढवली आणि रुजवली गेली. नगर शहरात अनिल राठोड यांच्या माध्यमातून सलग पाचवेळा शिवसेनेचा आमदार निवडून आला. बाळासाहेब विखे पाटलांच्या माध्यमातून शिवसेनेला खासदार मिळाला. शिवसेनेची नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी ताकद असतानाही बारापैकी अवघ्या एका जागेवर शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला. शिवसेनेचा पारंपारीक मतदारसंघ नसतानाही श्रीगोंद्याची जागा अक्षरक्ष: वाद घालून आणि शरद पवार- बाळासाहेब थोरात यांचा विरोध असताना मिळवली. अवघ्या दहा मिनिटात नागवडे यांना मशाल चिन्ह देण्यात आले. यासाठी साजनने नेहमीच्या स्टाईलने स्कीन करन्सीचा व्यवहार केला. राऊतांनी तो पावन करुन घेतला आणि वर्षानूवर्षे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नगर शहरासह पारनेरला वाऱ्यावर सोडून दिले. नगरची जागा शिवसैनिक मागत असतानाही राऊतांच्या त्या नाजूक हट्टापुढे उद्धव ठाकरे देखील गपगार पडले. जी जागा मिळविली ती आजच तिसऱ्या- चौथ्या स्थानावर फेकली गेलीय. म्हणजेच मिळालेली एक जागा देखील जिंकण्याची शक्यता कमी झालेली. मग, ठाकरेंच्या शिवसेनेला नगरमध्ये भोपळा देखील फोडता येणार नाही हे नक्की! संजय राऊतांनी शिवसेना संपवून टाकण्याची सुपारी घेतली असल्याची चर्चा आता नगरमध्ये जाहीरपणे होऊ लागलीय आणि हे सारे होत असताना उद्धव ठाकरे हे गपगार बसून कसे काय असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना पडलाय.

विधानसभेची निवडणूक यावेळी गाजतेय ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या लढाईने! अत्यंत चुरशीने ही निवडणूक होत असताना जिल्ह्यातील शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना न्याय मिळेल असे वाटत असताना प्रत्यक्षात उलटेच घडले. श्रीगोंद्यात शिवसेनेचे कोणतेही नेटवर्क नाही, नावगडेंच्या टेकूवर काष्टी गावचं सरपंच पद पदरात पाडून घेतलेल्या साजनचा अपवाद वगळता कोणताही मोठा पुढारी नसताना दहिहंडीच्या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत हे श्रीगोंद्यात आले होते. त्याचवेळी अनेकांना शंका आल्या होत्या. काहीतरी गुळपीठ असल्याशिवाय जिल्हा प्रमुख असणाऱ्या गाडेंसह अन्य साऱ्याच पदाधिकाऱ्यांना कोणतीच कुणकूण न लागू देता संजय राऊत यांचा श्रीगोंदा दौरा झाला होता. श्रीगोंद्यात शिवसेनेचा उमेदवार असणार असल्याची घोषणा त्यावेळी संजय राऊत यांनी केली होती. त्यांची ही घोषणा त्यावेळी अनेकांच्या चेष्टेचा विषय झाली होती.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना अवघ्या काही तासात नागवडेंच्या गळ्यात ठाकरेंची उमेदवारी पडली. जिल्ह्यातील अनेकांना त्यातून धक्का बसला. मात्र, त्याहीपेक्षा धक्का बसला तो शरद पवार, बाळासाहेब थोरात यांना! खोक्याच्या जोडीने साजनचे स्कीन करन्सी रॅकेट यशस्वी झाल्याच्या चर्चा आजही थांबायला तयार नाहीत. श्रीगोंद्याची जागा पदरात पाडून घेताना नगर शहर आणि पारनेरबाबत संजय राऊत चकार शब्दही बोलले नाही हे विशेष! नगर शहर सेनेचा हक्काचा मतदारसंघ असतानाही राऊत यांना तो मागावा असे का वाटले नाही असा प्रश्न नगरमधील शिवसैनिकांना पडलाय. तसाच प्रश्न पडलाय तो पारनेरमधील शिवसैनिकांना!

संजय राऊत हे शिवसेना पक्ष संपविण्यास निघालेत आणि त्यांनी तशी सुपारीच घेतली असल्याचा आरोप शिवसेना फुटीच्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनी केला होता. त्यात तथ्य असल्याबाबतची भावना आता नगरच्या शिवसैनिकांमध्ये आता दिसून येत आहे. सुपारी यशस्वी केलीच, अशा पोस्ट शिवसैनिकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून टाकल्याने त्यास पुष्टीच मिळत आहे. जिल्ह्यातील बारापैकी एक जागा मिळवली असली तरी त्या श्रीगोंद्याची जागा देखील विकली गेली. विकल्या गेलेल्या या जागेवर मशाल चिन्ह दिसत असले तरी हा उमेदवार चौथ्या स्थानावर जाऊन आपटणार अशा प्रतिक्रिया देखील आता उमटू लागल्या आहेत.

मशाल चिन्ह हातात घेऊन मतदारांच्या जाण्यासाठी शिवसैनिक तयार नाहीत. कारखाना आणि शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा दिसत असली तरी त्या कर्मचाऱ्यांचे निवडणुकीसाठी एक महिण्याचे वेतन कापले गेल्याने ते देखील फक्त शरीराने तिकडे असल्याची चर्चा आहे. कारखाना आणि शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर ही निवडणूक नक्कीच होणार नाही. महाविकास आघाडीतील दावेदार समजले जाणारे राहुल जगताप यांनी सवता सुभा मांडलाय. नागवडे यांनी व्यवहार करुन उमेदवारी आणताना साऱ्यांना गृहीत धरले आणि हेच गृहीत धरणे आता नागवडे यांना चौथ्या स्थानावर फेकणारे ठरले असल्याचे दिसत

प्राजक्त तनपुरे, रोहित पवार यांच्या डोक्यात गेलेली हवा निघणार!
स्वत:ची कोणतीही वेगळी ओळख नसताना मागील वेळी पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेलेल्या आणि विजयश्री गळ्यात पडताच सत्तेची हवा डोक्यात गेलेल्या प्राजक्त तनपुरे आणि रोहीत पवार या दोघांच्याही डोक्यातील हवा आणि मस्ती यावेळी मतदारांकडून जिरवली जाणार असल्याचे आजचे चित्र आहे. शिवाजीराव गाडे यांच्या अकाली निधनानंतर प्राजक्त तनपुरे यांना राहुरीच्या राजकारणात स्पेस भेटला. शिवाजीराव कर्डिले यांच्या विरोधात कुभांडी खेळ्या रचवत त्यांच्या विरोधकांना हाताशी धरण्याची खेळी प्राजक्त तनपुरे यांनी खेळली आणि निवडणूक होताच या साऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले. शिवाजीराजे गाडे यांच्या कार्यकर्त्यांबाबतही तेच घडले. मात्र, आता हेच गाडे समर्थक तनपुरे यांच्या विरोधात पेटून उठल्याने तनपुरे यांचे कायम हवेत दिसणारे विमान लँड होण्याच्या मार्गावर आले आहे. रोहीत पवार हे तर निवडणुकीनंतर कायम राज्याचे नेते झाल्यागत खुषमस्कऱ्यांच्या टोळीचे म्होरके झाले. वास्तवाचे भान ते विसरले. कर्जत- जामखेडकरांना आपण पैशावर विकत घेऊ शकतो ही भावना आता त्यांच्या मनात घर करुन बसलीय! मात्र, कर्जत-जामखेकरांनी त्यांचा स्वाभिमान इतकाही गहान ठेवलेला नाही. पैशांची मस्ती आलेल्या रोहीत पवार यांना त्यांच्याच मस्तीत ठेवून स्थानिक पर्याय निवडण्याच्या निर्णयाप्रत आता कर्जत- जामखेडकर आल्याचे पहिल्या टप्प्यात तरी दिसून येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुरब्बी राजकारण्यांनी माझी उमेदवारी कट केली; माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचा थेट आरोप

मुरब्बी राजकारण्यांनी माझी उमेदवारी कट केली; माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचा थेट आरोप शक्ती प्रदर्शन...

नगरच्या राजकारणात ट्विस्ट; ‘या’ मातब्बरांनी भरले अर्ज, कोतकर यांनी केले मोठे विधान…

कोतकर, कळमकर, गाडे, काळे, फुलसौंदर, बोराटेंचे अर्ज दाखल / शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी...

जिल्ह्यातील बंडोबांना पचनी पडेना उमेदवारी!

शिवाजी शिर्के | नगर सह्याद्री विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसात महायुती आणि...

सुजयला मारण्याचा कट? दहशतवादाचे बीज तुम्ही रोवलं; राधाकृष्ण विखे पाटील आक्रमक

राहता । नगर सहयाद्री:- भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी काँग्रेस...