spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: सुपा एमआयडीसीत 'धक्कादायक' प्रकार! निवडणुकीपूर्वीच ठोकल्या दोघांना 'बेड्या', प्रकरण काय?

Ahmednagar Crime: सुपा एमआयडीसीत ‘धक्कादायक’ प्रकार! निवडणुकीपूर्वीच ठोकल्या दोघांना ‘बेड्या’, प्रकरण काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
सुपा एमआयडीसीत एका टेम्पो चालकासोबत घडलेल्या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे. शरद बापू पवार (वय २७) व संदीप लक्ष्मण थिटे (वय ३७, दोघे रा. सय्यदमीर लोणी, ता. आष्टी, जि. बीड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी: विष्णू बाबासाहेब आघाव (वय ३९ रा. दहिवंडी, ता. शिरूरकासार, जि. बीड) हे ९ मे रोजी टेम्पो घेऊन सुपा एमआयडीसीत आले होते. ‘तू कंटनेरचा आरसा तोडला असून त्याची भरपाई करून दे’ असे म्हणून दोघांनी त्यांचे अपहरण केले होते. त्यानुसार याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याचा तपास करत होते. तपासादरम्यान तांत्रिक विशलेषणनाद्वारे सदरचा गुन्हा शरद पवार व संदीप थिटे यांनी केल्याचे समोर आले. ते नगर शहरातील वाडीया पार्कच्या गेटजवळ असल्याची माहिती मिळताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, बबन मखरे रवींद्र कर्डिले, अमृत आढाव, संतोष खैरे, मेघराज कोल्हे, सागर ससाणे, विशाल तनपुरे, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे,
संभाजी कोतकर, अरुण मोरे यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...

गुड न्यूज! 13 मे पर्यंत मान्सून अंदमनात धडकणार

मुंबई | नगर सह्याद्री मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यावष मान्सून लवकरच दाखल होणार...