सुपा । नगर सहयाद्री:-
गाडी लावण्याच्या वादातून लोखंडी रॉडने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याची घटना सुपा एमआयडीसीत घडली होती. याप्रकरणी नितीन शिवाजी दिवटे (रा. बाबुड ता.पारनेर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार सुमित वसंत शेळके (रा. पळवे खुर्द ता. पारनेर), ऋषिकेश उर्फ साहिल प्रकाश लोंढे (रा. मंगलमूत नगर, शिरूर, जि. पुणे ) याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा प्रकार सुपा एमआयडीसी परिसरात तीन दिवसांपूव घडला. शनिवार दि.8 रोजी आरोपी सुमित शेळके, ऋषिकेश लोंढे यांनी वरुण बेव्हरेज कंपनीत ट्रान्सपोर्टची गाडी लावली म्हणून फिर्यादी नितीन दिवटे यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. फिर्यादीची ब्रिझा कारच्या काचा फोडून नुकसान केले. आमच्या गाड्या आडवतो, तुझा बेत बघतो तू आमच्या नादी लागतो तुला मारून टाकतो अशी धमकी देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.
त्यानुसार सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपासादरम्यान सुपा पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ दिवटे यांना गुन्ह्यातील फरार आरोपी शिरूर परिसरातील मंगलमूत नगर येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सुपा पोलिसांच्या पथकाने सापळा रचत फरार आरोपींना जेरबंद केले. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय अधिकारी संपत भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सपोर्ई मोनिका जेजोट, कुटे, कानगुडे, खैरे, धामणे, पोलीस हेड कॉन्टेबल मरकड, योगेश सातपुते, विकास गायकवाड, यांनी सदरची कारवाई केली आहे.