अमर भालके। नगर सहयाद्री
कुकडी डावा कालव्याचे येत्या ३१ मे पासून आवर्तन सोडण्यात येणार आहे अशी माहिती कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुजित पाटील झावरे यांनी दिली आहे.
मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरीकांना पिण्यासाठी तसेच जनावरांच्या चारा पिकांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. शेतकरी वर्गाचे प्रश्न लक्षात घेता कुकडी कालवा समितीचे सदस्य सुजित पाटील झावरे यांनी पाणी प्रश्नाचा पाठपुरावा केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधुन कुकडी डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगामाचे सन २०२४ चे आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची मागणी केली.
त्यांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे असे आदेश दिले असून 31 मे रोजी पाणी आपल्या तालुक्यातील येईल अशी माहिती कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुजित पाटील झावरे यांनी दिली आहे.