भाजपाच्या नेतेमंडळींसह देवेंद्र फडणवीसजी तुम्ही सारे फक्त कागदीनेतेे!
धनंजय मुंडेंच्या कृषी खात्यात कोट्यवधींचा घोटाळा | धनुभाऊ, शेतकर्यांच्या तळतळाटाचं पाप लागणार बरं का?
ऑन दी स्पॉट रिपोर्ट | शिवाजी शिर्के
राज्याचा कृषीमंत्री किंवा राज्याच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी द्यायची याचा निर्णय राज्याचा मुख्यमंत्री घेत असतो आणि हा निर्णय घेताना तो त्याच्या पक्षाच्या नेत्यांशी अथवा घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत असतो. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे राज्यातील सध्याचे सरकार त्याला अपवाद ठरले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचा कृषीमंत्री मी ठरवतो आणि तो माझ्याच इशार्यावर काम करतो, असे एकदा- दोनदा नव्हे हजारदा बोलणार्या सुजित पाटील या अधिकार्याने कृषी खात्यात कोट्यवधींचा मोठा मलिदा खाल्यानंतर व त्याचे पुरावे समोर आल्यानंतरही त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस शिंदे- फडणवीस- पवार यांच्यापैकी एकाने देखील केले नाही. त्यामुळे कृषीमंत्री असणारे धनंजय मुंडे यांच्या खात्यातील कोट्यवधींचा मलिदा लुटत शेतकर्यांचा तळतळाट घेणार्या धनूभाऊंसह सार्यांनाच शेतकर्यांचा तळतळाट लागणार आणि त्याचा प्रत्यय येत्या निवडणुकीत येणार हे नक्की!
कृषी विभागाकडे शेतकर्यांच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या योजनांमध्ये लाभार्थी शेतकर्यांना लाभ देताना त्यांना निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविले जात असल्याच्या तक्रारी आल्या. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेतला आणि योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्याला साहित्य न देता त्या साहित्याची रक्कम त्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येऊ लागली. शेतकर्यांना यामुळे दर्जेदार साहित्य त्याच्या पसंतीनुसार खरेदीकरता येऊ लागले.
सदर योजनेत मुख्यमंत्र्यांना या योजनेमध्ये काही योजना, साहित्य यांचा समावेश करता येण्याचा अधिकार देण्यात आला. मात्र, काही योजना अथवा वस्तू वगळण्याबाबतचा अधिकार न देता त्यसाठी शासनाने स्वतंत्र आदेश काढून शेतकर्यांच्या या योजनांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागूू असताना कृषी विभागातील सुनील पाटील- सुजित पाटील यांच्या टोळीने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने शेतकर्यांच्या टाळूवरचे लोणी खायला प्रारंभ केला.
डीबीटी योजनेला हरताळ फासत मंत्रालयातील टोळीला हाताशी फासत शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या योजनेतील काही वस्तू कृषी उद्योग विकास महामंडळाच्या आडून खरेदी करण्यात आल्या आणि त्याद्वारे कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाण्यात आला. या योजनेतून शेतकर्यांना लाभ होण्याऐवजी पुरवठादार मालामाल झाले आणि त्यांच्या जोडीने सुजित पाटील- सुनिल पाटीलही! हे सारे होत असताना राज्याच्या कृषीमंत्र्यांकडे देखील संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. कारण ही कोट्यवधी रुपयांची खरेदी विनाटेंडर करण्यात आल्याचे समोर आले आहे. जवळपास साडेअकरा लाख शेतकर्यांना या योजनेतून लाभ मिळणे अपेक्षीत असताना प्रत्यक्षा मुठभर लोकांना याचा लाभ मिळाला आणि त्यातून पुरवठादार मालामाल झालेत.
देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांंप्रती चांगल्या भावनेतून सुरू केलेल्या या योजनेत कृषीमंत्र्यांनी परस्पर हात मारला की त्यांंना त्या खुर्चीत बसविल्याचा दावा करणार्या सुजित पाटील याने मारला याचा शोध घ्यावा लागणार आहे. अर्थात यातून कोट्यवधींचा गफलाच बाहरे येणार आहे आणि त्याची किंमत लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत या महायुतीला मोजावी लागल्यास आश्चर्य वाटू नये! कृषी विभागातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा सविस्तर वृत्तमालिका उद्याच्या अंकापासून! सुजित पाटील याला कोण पाठीशी घालतेय यासह कृषी विभागात शेतकर्यांच्या विविध योजनांना लुबाडणार्या टोळीचे कारनामे देखील नक्की वाचा!